मुंबई, 27 जुलै- शिक्षकांना गुरू म्हटलं जात. बहुतांश विद्यार्थ्यांसाठी (Students) त्यांच्या शाळेतील शिक्षक आदर्श असतात. कारण विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठीचं शिक्षण ते मुलांना देतात.त्यांना आईवडिलांसारखंच घडवतात. एखादा मुलगा अभ्यास नीट करत नसेल, अभ्यासात मागे राहत असेल तर शिक्षक त्या मुलाला समजावून त्याला अभ्यास करायला लावतात. लहानपणी अगदी बॅकबेंचर आणि हा भविष्यात काहीच करू शकणार नाही, असं वाटणारा एखादा विद्यार्थी सर्वांना अभिमान वाटेल अशा पदावर पोहोचतो, याचं बहुतांश क्रेडिट शिक्षकांना जातं. विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वेगवेगळे पर्याय निवडतात. पण सर्वच शिक्षक तसे नसतात, काही अपवादही असतात. अशाच अपवादात्मक प्रकरणाचा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय.
@famouspringroll या हँडलवरून एका ट्विटर युजरने व्हॉट्सअॅप चॅटचा (WhatsApp Chat) एक स्क्रीनशॉट शेअर केलाय. यामध्ये आशा नावाच्या ट्युशन टिचरने युजरला “तू आयुष्यात काहीही करू शकणार नाहीस, तू दहावीची परीक्षाही पास होणार नाहीस,” असं म्हटलं होतं. ट्यूशन टिचरच्या या शब्दांनी निराश झालेल्या विद्यार्थ्यांने चांगला अभ्यास करून 12वीची परीक्षा पास केली आणि ज्या कॉलेजात त्याला अॅडमिशन (Admission) घ्यायचं होतं तिथे प्रवेश घेतला आणि नंतर त्याने त्याच आशा नावाच्या ट्यूशन टिचरना व्हॉट्सअप मेसेज केला होता. त्या मेसेजमध्ये त्याने लिहिलंय, ‘मी तुमच्या 2019-2020 या 10 वीच्या बॅचचा विद्यार्थी आहे. मी तुम्हाला हा मेसेज करतोय, कारण तुम्ही त्यावेळी म्हटलं होतं की मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही, मी पास होणार नाही, असं म्हणत तुम्ही माझं खच्चीकरण केलं होतंत; पण मी माझी 12 वी ची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालोय आणि मला ज्या विद्यापीठात अॅडमिशन घ्यायचं होतं, तिथे मी मिळवलं.
याशिवाय आणखी एक कोर्स (Course) मला करायचा होता, तोदेखील मी करतोय. मी तुम्हाला थँक्यू म्हणायला मेसेज केलेला नाही, तर जे मी करू शकणार नाही, असं तुम्ही म्हटलं होतं ते मी करून दाखवलंय हे सांगण्यासाठी हा मेसेज केला आहे. त्यामुळे प्लीज या पुढे तुम्हाला अभ्यासात मदत मागणाऱ्या विद्यार्थांना खच्ची करू नका आणि त्यांच्याशी नम्रपणे वागा,” हा मेसेज त्या विद्यार्थ्याने आता ट्विटरवर शेअर करून दोन वर्षांपूर्वी आमचा निकाल लागल्यावर मी आणि माझ्या मित्राने आमच्या शिक्षिकेला हा मेसेज करायचं ठरवलं असं कॅप्शन या हँडलवर देण्यात आलं आहे. 22 जुलैला झालेलं हे ट्विट 5 हजारांहून अधिक वेळा रिट्विट झालं असून त्याला 59.4K इतके लाइक्स मिळाले आहेत.
(हे वाचा: Snake in Flight Meal : विमानातील जेवणात 'साप'; एअर हॉस्टेसने काही घास खाल्ले आणि....; Shocking Video )
सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट तुफान व्हायरल होत आहे. शिक्षकांनी मुलांशी नम्रपणे वागायला हवं, कारण मुलं ही त्यांच्याकडे शिकण्यासाठी येतात, असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर, काही नेटकऱ्यांनी त्यांचे शाळेतले अनुभवही शेअर केले आहेत. अनेकांना यावर टिचरनी काय उत्तर दिलं याचं कुतूहल होतं.तेही शेअर केलं गेलंय ज्यात टिचरनी म्हटलंय की ‘तरीही तू पास होण्याचं क्रेडिट मी घेऊ इच्छिते.’ या मागे टिचरचा उद्देश असाही असू शकतो की मी तुला खच्ची केल्यामुळे तू पेटून उठून अभ्यास केलास आणि आज या ठिकाणी पोहोचलास त्यामुळे त्याचं श्रेयही मला जातं. अर्थात सत्य तो विद्यार्थी आणि टिचर जाणोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Whatsaap