Home /News /viral /

तुरुंगातील कैदी निघाला Brilliant गणितज्ज्ञ, सोडवलं दशकांपासून न सुटलेलं गणित

तुरुंगातील कैदी निघाला Brilliant गणितज्ज्ञ, सोडवलं दशकांपासून न सुटलेलं गणित

अनेक वर्षापासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेला एक कैदी (Prisoner) गणितज्ञ (Maths expert) असून त्याने कुणालाही न सुटणारं गणित सोडवल्याची घटना समोर आली आहे.

    मुंबई, 6 सप्टेंबर : गणिताचा (Maths) विषय निघाला की भल्याभल्यांची भंबेरी उडते. अगदी शालेय जीवनापासून अनेकांना वाटणारी गणिताची भीती ही मोठेपणीदेखील कायम राहते. मात्र अनेक वर्षापासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेला एक कैदी (Prisoner) गणितज्ञ (Maths expert) असून त्याने कुणालाही न सुटणारं गणित सोडवल्याची घटना समोर आली आहे. जेलमधील (Jail) वेळ गणिते सोडवण्यात घालवणाऱ्या या कैद्यानं असं एक गणित सोडवलं, ज्यामुळे भल्याभल्यांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं. या कैद्याचं नाव ख्रिस्तोफर हेवन्स. खुनाच्या आरोपाखाली तो गेल्या 25 वर्षांपासून तुरुंगात खडी फोडतो आहे. शाळेचं शिक्षणही पूर्ण न केलेल्या ख्रिस्तोफरला गणिताची भलतीच आवड आहे. तुरुंगातील वेळ त्याने वेगवेगळी गणितं सोडवण्यात आणि त्याविषय़ी जाणून घेण्यात घालवला. तुरुंगात असताना तो गणिताबाबतची अनेक पुस्तकं मागवून घेत असे आणि वाचून संपवत असे. त्यातून त्याची गणिताची गोडी वाढत गेली आणि तुरुंगातूनच त्याने गणिताच्या काही परीक्षादेखील दिल्या. असं सोडवलं गणित एका प्रकाशकासोबत त्याचा नियमित पत्रव्यवहार सुरु असायचा. त्यावेळी त्याने काही मुद्दे पत्रातूनत त्यांना कळवले. त्यानंतर हे पत्र त्यांनी गणित विषयातील एका तज्ज्ञ प्राध्यापकांना दाखवलं. त्या प्राध्यापकांनी अत्यंत अवघड आणि त्यांनाही अनेक वर्षांपासून न सुटलेली प्राचीन गणितं त्या कैद्याकडे पाठवली. त्याला त्याविषयी काही समजेल, अशी त्यांची अपेक्षाही नव्हती. मात्र ख्रिस्तोफरने अनेक दशकांपासून न सुटलेलं गणित चक्क सोडवलं आणि एका कागदावर ते सविस्तरपणे मांडलं. हे गणित सोडवण्याची पद्धत, त्याची सूत्रं आणि त्याचा निष्कर्ष या सगळ्या गोष्टी सूत्रबद्धरित्या मांडून त्याने तो कागद पोस्टाने प्राध्यापकांना पाठवून दिला. ते वाचून प्राध्यापकही अवाक झाले. आपल्याला अनेक वर्षे न सुटलेले गणित शालेय शिक्षणही पूर्ण झालेल्या एका कैद्याने सोडवल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. बघता बघता, ही बाब परिसरात पसरली आणि सर्वजण या गणितज्ञ कैद्याची चर्चा करू लागले. काहींना तर त्यावर विश्वासही बसला नाही, तर काहींना या कैद्याचं जामच कौतुक वाटलं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Maths, Prisoners

    पुढील बातम्या