नवी दिल्ली, 21 मार्च : जगभरात अनेक करामती आणि जुगाडू लोक आहेत. जे कधी काय करतील याचा नेम नाही. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टी ते करताना दिसतात. जगभरातील अशा जुगाडू, हटके लोकांचे व्हिडीओ कायमच समोर येत असतात. आपल्या हटके गोष्टींनी ते नेहमीच नेटकऱ्यांना थक्क करतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ अधिक पाहिले जातात आणि कमी वेळात धुमाकूळ घालतात.
सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये व्यक्तीच्या हटके स्टंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पहायला मिळतेय जीने नवीन शूज घातले आहेत, पण पुढे पाणी आणि चिखल असल्यामुळे तो शूज भरवू शकत नव्हता. मग तो हटके आयडिया काढत समोर असलेला पाणी आणि चिखलाचा भाग पार करतो. पाणी आणि चिखलातून व्यक्ती चक्क हातावर चालत जाताना दिसते. व्यक्ती उलटी हातावर उभे राहून एवढ्या दूर जाते हे पाहून नेटकरी थक्क झालेत.
#New #Shoes (जूते) खरीद कर घर जाना हो 😜😁😁@ipsvijrk @dhruman39 pic.twitter.com/jF2WaVO0bC
— Rupin Sharma IPS (@rupin1992) March 17, 2023
हा मजेशीर व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे आणि मजेशीरपणे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'नवीन शूज खरेदी केल्यानंतर घरी जाताना'. एक मिनिट 21 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 21 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
दरम्यान, सोशल मीडियावर असे हटके जुगाडू प्रकाराचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक विचित्र, मजेशीर, धोकादायक अशा अनेक प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतात. नेटकरीही अशा व्हिडीओंना पसंती दर्शवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Top trending, Videos viral, Viral news