मराठी बातम्या /बातम्या /Viral /

व्यक्तीने हातावरच केला बारकोड टॅटू; कारण वाचून व्हाल थक्क

व्यक्तीने हातावरच केला बारकोड टॅटू; कारण वाचून व्हाल थक्क

बारकोड

बारकोड

शरीरावर टॅटू काढणं हा सेल्फ एक्सप्रेशन अर्थात स्व-अभिव्यक्तीचा एक प्रकार मानला जातो. कित्येक शतकांपासून टॅटू काढण्याची प्रथा चालत आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : शरीरावर टॅटू काढणं हा सेल्फ एक्सप्रेशन अर्थात स्व-अभिव्यक्तीचा एक प्रकार मानला जातो. कित्येक शतकांपासून टॅटू काढण्याची प्रथा चालत आली आहे. याचे अनेक ऐतिहासिक पुरावेही सापडलेले आहेत. आजकाल बहुतेक टॅटू हे प्रतीकात्मक कारणांसाठी काढले जातात. वेगवेगळे टॅटू काढून घेणं, ही अतिशय सामान्य बाब ठरत आहे. काही व्यक्ती त्यांच्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाच्या गोष्टींकडे अत्यंत आकर्षित होतात. अशा गोष्टी सतत आपल्या जवळ असाव्यात किंवा सतत आठवणीत असाव्यात यासाठी ते शरीरावर त्याचे टॅटू गोंदवून घेतात. आत्तापर्यंत तुम्ही असे अनेक टॅटू बघितले असतील. पण, तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? बारकोड हा एखादं प्रॉडक्ट किंवा किंमत स्कॅन करण्यासाठी असतो. ऑनलाइन पेमेंटच्या ट्रेंडमुळे तर बारकोडला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. दिवसभरात अनेकदा मोबाईलचा वापर करून आपण विविध बारकोड स्कॅन करतो. पण, तैवानमधील एका व्यक्तीनं आपल्या बँक अकाउंटचा बारकोड हातावर टॅटू करून घेतला आहे. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

डिजिटायझेशनमुळे आजकाल रोख पेमेंट करण्याची पद्धत हळूहळू नाहीशी होत आहे. ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी पान खाण्यासाठी किंवा चहा पिण्यासाठी साध्या टपरीवर गेलो तरी तिथे बारकोड ठेवलेला असतो. तुम्ही तुमच्या फोनने हा कोड स्कॅन केला की संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. दिवसभरात आपण अशी अनेक लहान-मोठे पेमेंट करतो. त्यासाठी सतत मोबाईलचा वापर करावा लागतो. तैवानमधील एक व्यक्ती या पद्धतीला लवकरच कंटाळली. फोनचा वापर न करताही पेमेंट करता यावं, यासाठी या व्यक्तीनं अनोखी शक्कल लढवली आहे. या व्यक्तीनं आपल्या बँक अकाउंटचा बारकोड हातावर टॅटू करून घेतला.

हेही वाचा -  नवरदेवानं सगळ्यांसमोर Kiss करताच नववधूनं नाकारलं लग्न कारण...

तैवानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'डीकार्ड'वर या व्यक्तीची गोष्ट व्हायरल झाली आहे. सोशल मीडिया अॅपवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीनं म्हटलं आहे की, खूप दिवसांपासून तो एखादा टॅटू गोंदवून घेण्याचा विचार करत होता. इतर टॅटू करून घेण्यापेक्षा बारकोड गोंदवून घेण्याची कल्पना त्याला सुचली आणि ती प्रत्यक्षातही उतरवली. आता जेव्हा-जेव्हा पेमेंट करण्याची वेळ येते तेव्हा ही व्यक्ती आपला हात दाखवते.

अनोखा टॅटू करून घेणाऱ्या व्यक्तीचं नाव उघड करण्यात आलेलं नाही. मात्र, सध्या ही व्यक्ती तैवानमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सर्वत्र या बारकोड टॅटूची चर्चा रंगली आहे.

First published:

Tags: Viral, Viral news