मराठी बातम्या /बातम्या /Viral /महाकाय मगरीसोबत रोमॅंन्टिक डान्स करताना दिसली व्यक्ती, Video पाहून व्हाल शॉक

महाकाय मगरीसोबत रोमॅंन्टिक डान्स करताना दिसली व्यक्ती, Video पाहून व्हाल शॉक

व्हायरल

व्हायरल

जंगलामध्ये एकापेक्षा एक अनेक भयानक प्राणी आढळतात. शिकारीसाठी सर्वचजण एकमेकांवर तुटून पडताना दिसतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 27 मार्च : जंगलामध्ये एकापेक्षा एक अनेक भयानक प्राणी आढळतात. शिकारीसाठी सर्वचजण एकमेकांवर तुटून पडताना दिसतात. यातील एक भयंकर, भीतीदायक प्राणी म्हणजे मगर. मगर पाण्यातील सर्वात भयंकर प्राणी असून अनेकजण तिला पाहण्याचीही हिंमत करु शकत नाही. मात्र असेही काही महाभाग असतात जे नको ते धाडस आणि नको तो स्टंट करायचा प्रयत्न करतात. कधी तो प्रयोग फसतो तर कधी हा प्रयोग चालून जातो. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चक्क मगरीसोबत डान्स केल्याचं पहायला मिळत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की एका तलावात व्यक्ती मगरीसोबत रोमॅंन्टिक डान्स करत आहे. अगदी सहा सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मगरीला मिठी मारून डान्स करण्याचं व्यक्तीचं धाडस पाहून सर्वच थक्क झाले आहेत. व्यक्तीच्या धाडसाला सलाम करत आहे. मगरीनेही अगदी शांततेच तिचं डोकं व्यक्तीच्या डोक्यावर ठेवलं आहे. काही वेळातच या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला.

@StrangestMedia नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहे. अनेकजण या व्हिडीओला ट्रोल करत आहेत तर काहीजण मजा घेत आहेत. त्यामुळे व्हिडीओवर एकंदरित संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळतायेत.

दरम्यान, मगर संतापात आपल्या जबड्याने कोणालाही फाडून खाऊ शकते, क्षणात होत्याचं नव्हतं करु शकते. त्यामुळे मकरीच्या जबड्यापासून प्राणीही दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र या व्यक्तीने चक्क मगरीसोबतच डान्स करण्याचं धाडस केलं. यापूर्वीही मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये मगरीचा भयावह अवतार पहायला मिळाला.

First published:
top videos

    Tags: Crocodile, Dance video, Social media viral, Top trending, Videos viral, Viral, Wild animal