नवी दिल्ली, 28 मार्च : जगभरात एकपेक्षा एक धोकादायक आणि भीतीदायक प्राणी आहेत. काहींच्या तर नावानेच थरकाप उडतो. यापैकीच नाव म्हणजे साप, नाग, कोब्रा. यापैकी काहीही पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर काटा येतो. सापांचे अनेक धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चक्क भल्यामोठ्या नागालाच अंघोळ घातली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाथरुममध्ये एक व्यक्ती बादलीत पाणी घेऊन नागाला अंघोळ घालतोय. नागाला न घाबरता हा व्यक्ती मगाच्या सहाय्याने त्याच्यावर पाणी टाकत आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Rare video of me and my ex bathing together ❤️#boycottadda247 pic.twitter.com/gxlalV2fK4
— Abhishek (@aeebhishek) March 23, 2023
@aeebhishek नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसतायेत. अनेकजण व्यक्तीच्या हिमतीला दाद देत आहेत. आत्तापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्युज आले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसला बसेल की कोणी नागाच्या एवढं जवळ कसं जाऊ शकतं, अंघोळ घालायची गोष्ट तर दूरच. मात्र व्हिडीओमधील व्यक्तीला पाहून नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येतायेत.
दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापूर्वीही साप, नाग, कोब्राचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अनेकांना असे व्हिडीओ पाहिले तरी धडकी भरते. अतिशय धोकादायक असणाऱ्या या प्राण्यांच्या एका हल्ल्यानेही माणसाचा जीव जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake video, Social media viral, Viral, Viral videos