• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: काकाही लोकलला वैतागले वाटतं; ट्रेन खरेदी करण्यासाठी बँकेकडून मागितलं 300 कोटी लोन

VIDEO: काकाही लोकलला वैतागले वाटतं; ट्रेन खरेदी करण्यासाठी बँकेकडून मागितलं 300 कोटी लोन

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 • Share this:
  Viral : लोन (Loan for Train) घेण्यासाठी तुमच्याकडे अनेक बँकांचे फोन येत असतील. अनेक तर इतके त्रास देतात, की ग्राहक आपला नंबरदेखील बदलायला तयार होतात. मात्र दुसरीकडे अनेक ग्राहक बँकांकडील कर्मचाऱ्यांची चांगलीच शाळा घेतात. याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही हसणं रोखू शकणार नाही. काय केलं काकांनी? सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होता.  काही व्हिडीओ हृदयाला स्पर्शून जातात. लोनशी संबंधित फोन तर तुम्हाला अनेकदा येत असतील. आता लोनशी संबंधित हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. (A man asked loan of Rs 300 crore from a bank to buy a train video viral on social media) हे ही वाचा-Viral : गणिताच्या टीचरने विचारला असा प्रश्न; शाळेत सरांच्या धपाट्याची येईल आठवण या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फोनवर बोलत आहे. ज्यात तो लोन घेण्याबद्दल बोलत आहे. मात्र ज्या गोष्टीसाठी लोन मागत आहे, ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. ती व्यक्ती ट्रेन खरेदी करण्यासाठी 300 कोटी रुपयांच्या लोनची मागणी करीत आहे. जे ऐकल्यानंतर फोनवरील मुलीलाही धक्काच बसला. यानंतर ही ती त्यांना अनेक प्रश्न विचारले. या व्यक्तीच्या शेजारी बसलेली महिला गालात हसताना दिसत आहे. हे सर्व संभाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: