दाहोद, 16 ऑगस्ट : दाहोदमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. येथे एका पिकअप ट्रकच्या धडकेत एका मजुराचा मृत्यू झाला आहे. हा मजुर आपल्या सहकाऱ्यासह कोपऱ्यात सावलीत बसला होता. समोर उभा असलेला पिकअप ट्रक अचानक त्याच्या अंगावर आला व या दुर्घटनेत त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या शेजारी बसलेले सहकारी सुदैवाने यात बचावले आहेत. जवळच्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रसंग कैद झाला आहे.
या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. अपघाताच्या तपासणीत नेमका प्रकार समोर आला असला तरी या दुर्घटनेत एकाचा जीव गेला आहे. ही घटना दुपारी घडली. दुपारच्या उन्हात मजुर एका दुकानासमोर आराम करीत होता, तेव्हा एक पिकअप ट्रक चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटलं आणि त्याने भिंतीला धडक दिली. या भिंतीला लागून काही मजूर बसले होते. यात एकाचा मृत्यू झाला.
દાહોદ APMC પાસે અકસ્માતનો લાઈવ વિડિયો અકસ્માતમાં 1નું મોત pic.twitter.com/e1MxMXPa5A
— News18Gujarati (@News18Guj) August 16, 2021
या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला आहे. मजुराच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या अपघातात सुदैवाने दुसरे मजूर बचावले आहे. घटनेबाबत माहिती मिळताच दाहोद पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्याची या प्रकरणात तपास सुरू केला आहे. घटनेनंतर जवळच्या दुकानातून सीसीटीव्ही फुजेट मिळालं आहे. यावरुन स्पष्ट पणे दिसून येत आहे की, पिकअप गाडी अचानक वळली आणि एका भिंतीला धडक दिली. या भिंतीला लागून काही मजूर आराम करीत बसले होते.
हे ही वाचा-दरीत कोसळत होती कार...; भारतीय सैन्य दलाने चालकाचा वाचवला जीव, VIDEO VIRAL
मृत्यूचा हा व्हिडीओ खरंच हैराण करणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Crime, Death, Gujrat, Shocking accident, Shocking video viral