चमोली, 30 जानेवारी : उत्तराखंडच्या चामोली येथे सध्या हिमवर्षाव होत आहे. 0 डिग्री तापमान असलेल्या चामोलीमध्ये लोकांना घरातून बाहेर पडणेही शक्य नसताना नवरदेवानं चक्क याच बर्फातून आपली वरात काढली.
उत्तराखंड येथे बर्फात एक अनोखा विवाह साजरा करण्यात आला, जिथे नवरदेव बर्फातून चक्क चार किलोमीटर चालत गेला. ही घटना उत्तराखंड येथील बिज गावात घडली. विशेष म्हणजे, सर्व डोंगराळ राज्यात सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे.
डोंगरावरील हिमवर्षाव पर्यटकांसाठी चांगली बातमी ठरत असताना स्थानिक लोकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे चक्क लग्नही रद्द होत आहेत. असे असतानाही अशा वातावरणात चक्क एका नवरदेवाने बर्फातून वरात काढली.
वाचा-पाळीव कुत्र्याने चिमुरड्याचा पकडला पाय, जमावाने काठी दगडांने बेदम मारलं पण..
Uttarakhand: A groom travelled four km on foot to reach the bride's home in Bijra village in Chamoli district as roads were closed due to heavy snowfall in the region. pic.twitter.com/sS9pjqdZLL
— ANI (@ANI) January 29, 2020
वाचा-तुम्ही चुकीच्या पद्धतीने लावताय लिपस्टिक, जाणून घ्या योग्य पद्धत
थंडीमुळे रस्ते बंद
वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, एका नवरदेवाने 4 किमी चालत वरात काढली. यावेळी बर्फवृष्टी होत असल्यामुळं प्रत्येकाने डोक्यावर छत्री घेतली होती. ही वरात बीज येथून चमोली जिल्ह्यातील बिरजा गावात गेली. बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद झाला होता. विशेष म्हणजे, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे.
वाचा-IPL खेळण्यासाठी उतावळा झाला पाक खेळाडू, 12 वर्षांपूर्वी सचिनला केलं होतं बाद