Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लोकांची नखं कापून करोडपती बनली ही महिला; फक्त नेलपेंट लावण्यासाठीच घेते इतकी रक्कम

लोकांची नखं कापून करोडपती बनली ही महिला; फक्त नेलपेंट लावण्यासाठीच घेते इतकी रक्कम

30 वर्षाच्या एनाबेलचं नेल आर्ट व्हायरल होताच ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली. तिचे ऑनलाईन साडेसात लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत

30 वर्षाच्या एनाबेलचं नेल आर्ट व्हायरल होताच ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली. तिचे ऑनलाईन साडेसात लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत

30 वर्षाच्या एनाबेलचं नेल आर्ट व्हायरल होताच ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली. तिचे ऑनलाईन साडेसात लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : आजकाल इतर कोणाच्या हाताखाली करून नोकरी करणापेक्षा लोक स्वतःचा व्यवसाय (Business Startup Ideas) करण्याला अधिक प्राधान्य देतात. यामागचं कारणंही अतिशय क्लियर आहे. स्वतःचा व्यवसाय असेल तर माणूस आपल्या कल्पना आणि कल्पकता यांचा अगदी योग्य आणि मनाप्रमाणे वापर करू शकतो. यामुळे यशाची शक्यता अधिक वाढते. आधीच्या काळात काहीच ठरलेल्या कल्पना यशस्वी होत असे. मात्र, आजच्या काळात नवनवीन बिझनेसही भरपूर पैसा मिळवून देतात.

खाऊन खाऊन थकाल पण पदार्थ संपणार नाहीत; परवडणाऱ्या दरात या हॉटेलात अनलिमिटेड खा

ब्रिटनची रहिवाशी असलेल्या एनाबेलनं 10 वर्षांपूर्वी लोकांची नखं स्वच्छ करून त्यावर आर्ट करण्याचं काम (Business of Nail Art) सुरू केलं होतं. आपल्या आईच्या किचनमध्ये तिच्या मैत्रिणींचे नेल आर्ट करता करता एनाबेलनं भरपूर नाव कमवलं. तिचं काम पाहून लोक इतके खूश झाले की तिच्याकडे अनेकजण नेल आर्टसाठी येऊ लागले. हा व्यवसाय इतका यशस्वी झाला की आज ती नेल आर्टच्या माध्यमातून करोडो रुपयांचा बिझनेस करते. तिनं आपल्या आईच्या किचनपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता मोठ्या वेअरहाऊसमध्ये शिफ्ट केला आहे.

30 वर्षाच्या एनाबेलचं नेल आर्ट व्हायरल होताच ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली. तिचे ऑनलाईन साडेसात लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. एनाबेलने आपलं काम दहा वर्षापूर्वी सुरू केलं होतं. तिनं घरीच आपल्या आईच्या किचनमध्ये छोटासा सेटअप लावला होता. यात तिच्या बहुतेक क्लायंट्स या तिच्या आईच्या मैत्रिणीच असत. तिथे काम चांगलं जमल्यानं तिनं स्टेफोर्डशायरमध्ये एक सलून सुरू केलं, इथे तिनं यूनिकॉर्न थीम नेल आर्ट सुरू केलं. यानंतर तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज एका नेल आर्टसाठी ती लाखो रुपये घेते. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यामातूनही तिची कमाई होते.

दिमाग का दही! आकाशात उलटा उडाला हंस, विश्वास बसत नसेल तर पाहा PHOTOs

आता एनाबेल 55 हजार स्क्वेअर फूट वेअरहाऊसमध्ये आपला सलून चालवते. सलूनची थिमदेखील युनिकॉर्न बेस्ड आहे. एनाबेलचा हा व्यवसाय लोकांनी आवडतो. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तिने केवळ दोन दिवसाची ट्रेनिंग घेतली होती. यातूनच तिने नेल आर्टची कला व्यवसायात बदलण्याचा विचार केला. सध्या आपल्यी पतीच्या मदतीने ती अगदी चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय चालवत आहे

First published:

Tags: Small investment business, Start business