पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्याची भन्नाट आयडिया, शेतात उभा केला भलताच प्राणी

पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्याची भन्नाट आयडिया, शेतात उभा केला भलताच प्राणी

भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती कुणापासून लपलेली नाही. नैसर्गिक आपत्तींपासून ते वन्य प्राण्यांपर्यंत सर्वांचाच शेतकऱ्यांना धोका असतो.

  • Share this:

शिवमोगा (कर्नाटक), 03 डिसेंबर : भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती कुणापासून लपलेली नाही. नैसर्गिक आपत्तींपासून ते वन्य प्राण्यांपर्यंत सर्वांचाच शेतकऱ्यांना धोका असतो. त्यामुळं आपली जमापुंजी वापरून लावलेले पिके जपण्यासाठी विविध शक्कल लढवाव्या लागतात. त्यामुळं कितीही अडचणी आल्या तरी भारतीय शेतकरी स्वतःहून संघर्ष करताना दिसत आहेत. अशीच एका शेतकऱ्यांनं वाघापासून आपली पिकं वाचवण्यासाठी एक भन्नाट कल्पना काढली.

कर्नाटकमध्ये कॉफी आणि सुपारीच्या पिकांचे माकडांपासून संरक्षण करण्यासाठी या शेतकऱ्यांनी एक आश्चर्यकारक मार्ग काढला. शिवमोगा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपल्या पाळीव श्वांनाना चक्क वाघासारखे रंगवले. नालूरु गावचे रहिवासी श्रीकांत गौडा यांनी ही कल्पना काढली. याबाबत एएनआयशी बोलताना गौडा यांनी आपल्या श्वानाचे रूपांतर वाघात का केले हे सांगितले आहे.

वाचा-6 तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश, पाहा EXCLUSIVE VIDEO

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना गौडा यांनी, “यापूर्वी आम्ही वाघासारखी खेळणी देखील वापरली होती, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी गोव्यातून वाघासारख्या खेळण्या मागितल्या असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु काही दिवसांनंतर त्यांचा रंग अधिक हलका झाला आणि संपूर्ण पिके खराब करुन माकडे परत आले. यानंतर, पाळीव श्वानांना वाघासारखे रंगविण्यासाठी एक मार्ग सापडला.

वाचा-मोबाइल रिचार्ज महागले तरी सरकार म्हणते स्वस्तच!

वाचा-100 रुपये खर्च करून रेल्वेला मिळणारे उत्पन्न वाचून तुम्हीही म्हणाल कसं शक्य आहे?

श्रीकांतने सांगितले की, “मी बुलबुल (पाळीव श्वानाचे नाव) दोन वेळा शेतात नेतो. एकदा सकाळी आणि पुन्हा संध्याकाळी. सर्व माकड त्याला पाहून पळून जायचे. आता माकडे शेतापासून खूप दूर राहतात”. त्याचवेळी श्रीकांत गौडा यांची मुलगी अनन्या म्हणाली की तिच्या वडिलांची कल्पना आता गावातील प्रत्येकजण वापरत आहे. सध्या या शेतकऱ्याच्या या कल्पनेनं सगळ्यांचे मन जिंकले आहेत. तसेच, या श्वानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: December 3, 2019, 4:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading