नवी दिल्ली, 24 मार्च : मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दिवसभरात अनेकजण मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसतात. अनेकवेळा मेट्रोमध्ये घडणाऱ्या घटनांचे व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मेट्रोमध्ये अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात अनेक लोक व्हायरल होत असतात. अशातच मेट्रोमधील एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत राडा घातला.
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, दारू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे, परंतु सर्व काही माहित असूनही लोक दारू पितात आणि नंतर हाय व्होल्टेज ड्रामा करतात. आता ही क्लिप तुम्हीच बघा जिथे एक मद्यपी मेट्रोत प्रवास करत असताना क्षुल्लक कारणावरून वाद घालू लागतो आणि हा व्हिडीओ बघून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
View this post on Instagram
हा व्हायरल व्हिडिओ 14 मार्च रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक मद्यधुंद व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. यादरम्यान तो दुसऱ्याशी वाद घालू लागतो. जिथे तो म्हणतो की मी टोकन घेतले आहे… मी नोएडा सेक्टर 15 वरून येत आहे आणि इथे उतरेन. तितकीच मला काळजी आहे. तू मला शिकवशील.' मग तो सरदारजींना समोर पाहून नतमस्तक होतो आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकायला लागतो. त्यावर सरदारजी म्हणतात - बेटा, तुझे स्टेशन आले आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून चर्चेमध्ये आला आहे.
दरम्यान, SUPERBAKCHOD नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंटदेखील येतायेत. दोन पॅक घेतल्यावर माझा मित्र असा करतो, असं व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलं आहे. व्यक्तीने दारु चढवल्याचं एकंदरीत त्याच्या कृतीवरुन दिसतंय. असे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol, Top trending, Viral, Viral videos