नवी दिल्ली, 24 मे : सोशल मीडियावर लोक अनेक निरनिराळे स्टंट व्हिडीओ करताना दिसतात. प्रसिद्धीसाठी लोक आपल्या जीवाशीही खेळ करतात. त्यामुळे त्यांचा स्टंट त्यांच्याच अंगलट येतो. आत्तापर्यंत सोशल मीडियावर खूप सारे स्टंट व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये.
लोक बसून किंवा उभं राहून चहा पितात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये महिला चक्क स्टंट करताना दिसत आहे. तरुणीचा व्हिडीओ आणि हटके अंदाज सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
व्हिडीओमध्ये एक तरुणी समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन किटलीमधून चहा काढत कपमध्ये टाकत पित आहे. सर्फिंग बोर्डवर तिचा तोल सांभाळत ती हा स्टंट करताना दिसत आहे. हातात चहाची किटली कप असूनही मुलीचा तोल डगमगत नाही. त्यामुळे तरुणीचा धाडसीपण स्पष्टपणे दिसून येतोय.
View this post on Instagram
thebeautifulshorts नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर खूप कमेंट येत असून तरुणीचं कौतुकही केलं जात आहे.
हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ दुबईतील असून तरुणी दुबईतील समुद्रात हा स्टंट करत आहे. तरुणीचा धाडसी अंदाज पाहून भल्याभल्यांचे डोळे मोठे झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media viral, Stunt video, Tea, Viral, Viral news