हा हृदयस्पर्शी व्हिडिओ खूप चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे. तरुण योग्यवेळी तिथे पोहोचला नसता तर कुत्रा जोराच्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ शकत होता. अशा स्थितीत तो तरुण काही लोकांच्या मदतीने खाली उतरतो. तो प्रथम श्वानाजवळ पोहोचतो आणि त्याला प्रेमाने मिठी मारतो. यातून तो कुत्र्याची भीती कमी करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर, तो त्याला आपल्या मांडीवर घेतो आणि लोकांच्या मदतीने त्याला पाण्यातून वर काढतो. बापरे! श्वानाच्या तोंडात घुसला जगातील सर्वात विषारी साप; वाचवण्यासाठी मालकिणीने हात टाकला अन्... कुत्र्याचा जीव वाचवल्यानंतर तो तरुण आपल्या मित्रांची मदत घेत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मानवतेचं उदाहरण देणारा हा सुंदर व्हिडिओ योग नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यासोबत 'वाहत्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला लोकांनी वाचवलं', असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तरुणाच्या या उदात्त कृतीचं नेटिझन्सकडून कौतुक होत आहे.Guys rescue a dog stranded in rushing waters.. pic.twitter.com/mzzJhyK7WT
— o̴g̴ (@Yoda4ever) May 27, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Video Viral On Social Media