Home /News /viral /

कोरोनानंतर लाडक्या पत्नीसाठी ठेवली दारूची पार्टी; 4 महिलांसह पतीची तुरुंगात रवानगी

कोरोनानंतर लाडक्या पत्नीसाठी ठेवली दारूची पार्टी; 4 महिलांसह पतीची तुरुंगात रवानगी

कोरोनातून पत्नी सुखरुप बरी झाली होती. मात्र तरीही ती तणावात होती. तणाव दूर करण्यासाठी प्रेमळ पतीने लाडक्या पत्नीसाठी दारू पार्टी ठेवली होती. मात्र ही पार्टी त्यालाच महागात पडली.

    अहमदाबाद, 17 मे: गुजरातमधील अहमदाबाद येथे एका पतीला आपल्या पत्नीला खूश करणे महागात पडले आहे. त्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे. त्याचं झालं असं की एका व्यक्तीच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. ती त्यातून बरी झाली. मात्र तरीही तिच्यावर कोरोनाचा परिणाम होता व ती तणावात होती. पत्नीचा तणाव दूर करण्यासाठी पतीने घरात दारूच्या पार्टीचं आयोजन केलं. पार्टीत त्याने आपल्या मित्रांच्या पत्नींनाही बोलावलं. सर्वजण पार्टी इन्जॉय करीत होते. तेव्हाच पोलीस तेथे हजर झाले व सर्वांना अटक केली. ही घटना सोला ठाण्यातंर्गत थलतेज-शिलाज रोडवरील ग्रीन एव्हेन्यू मेपल काऊंटी -1 येथील आहे. पोलिसांनी सांगितलं की, अटक केलेल्या पतीने सांगितलं की, त्याने पत्नीवरील तणाव दूर करण्यासाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. हे ही वाचा-नवरीच्या घरात सुरू होती लग्नाची धावपळ; 2 नवरदेवांच्या वराती पाहून वऱ्हाडी शॉक पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या महिलेने पतीला सांगितलं... पोलिसांनी सांगितलं की, ही पार्टी अपार्टमेंट जी-301 मध्ये सुरू होती. येथे एका महिलेची अनेकांनी खिल्ली उडवली. तिने फोन करून आपल्या पतीला याबाबत सांगितलं. पत्नीची खिल्ली उडवली म्हणून नाराज झालेल्या पतीने पोलीस कंट्रोल रुममध्ये फोन केला आणि दारू पार्टी सुरू असल्याची सूचना दिली. मग झाली अटक.. पोलीस साधारण रात्री पावणे नऊ वाजता फ्लॅटमध्ये पोहोचले आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वांना ताब्यात घेतलं. अटक केलेल्यांमध्ये पार्टी होस्ट करणारी केतन पटाडिया अडानी शांतिग्राम येथील निवासी अनुराधा गोयल (40), सिंधू भवन रोडवरील अक्षर स्टेडियम येथे राहणारी शेफाली पांडे (36), मानेकबाग सोसायटीतील प्रियंका शाह (31) आणि थलतेजमधील हेलकोनिया अपार्टमेंटमध्ये राहणारी पायल लिंबाचिया (40) यांचा समावेश आहे. होस्टच्या पत्नीला नाही केली अटक केतन पटाडिया यांची पत्नी अमोला पटाडिया (42) यांना पोलिसांनी अटक केली नाही. कारण त्या दारू प्यायल्या नव्हत्या. पोलिसांनी एक लिटर जॉनी वॉकर ब्लॅक लेबल व्हिस्कीची बाटली जप्त केली आहे. ज्यात केवळ 100 मिलीलीटर दारू शिल्लक होती. बाकी दारू संपली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन पटाडिया हे हिरे व्यावसायिक आहेत. ज्यांचं मेमनगर फायर स्टेशनसमोर कार्यालयत आहे. केतन पटाड़िया आणि त्या चार महिलांना अटक करण्यात आली असून ते सर्व जण नशेच्या अवस्थेत होते. त्यानंतर मात्र त्यांना जामिन देण्यात आला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Alcohol, Wife and husband

    पुढील बातम्या