74 वर्षीय व्यक्तीने मगरीच्या तोंडातून कुत्र्याला काढलं बाहेर; Viral Video वर इस्रायलच्या पंतप्रधानांनीही दिली प्रतिक्रिया

या प्राणीप्रेमीने आपल्या कुत्र्याचा जीव वाचविण्यासाठी मगरीच्या तोंडात हात घातला.

या प्राणीप्रेमीने आपल्या कुत्र्याचा जीव वाचविण्यासाठी मगरीच्या तोंडात हात घातला.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर :  आतापर्यंत तुम्ही अनेक प्राणीप्रेमी पाहिले असतील, मात्र या प्राणीप्रेमी व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्याचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. ही घटना फ्लोरिड येथील आहे. येथे एका 74 वर्षांच्या रिचर्ड विलबँक्सने (Richard Wilbanks) आपल्या कुत्र्याचा जीव वाचविण्यासाठी मगरीच्या तोंडात हात घातला. रिचर्डने जीव धोक्यात घालून कुत्र्याला वाचवलं सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रिचर्डने कुत्र्याला वाचविण्यासाठी तलावात उडी मारली आणि मगरीच्या तोंडातून त्याला जिवंत बाहेर काढलं. विशेष म्हणजे मगरीने कुत्र्यावर हल्ला केल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता रिचर्ड कुत्र्याला वाचविण्यासाठी पुढे गेला आणि त्याला सुरक्षित बाहेर काढलं. या घटनेवरुन तुम्ही अंदाज लावू शकता की आपल्या पाळीव प्राण्याला वाचविण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी प्राणीपालक स्वत:चा जीवही धोक्यात घालू शकतात. ते आपल्या बाळाप्रमाणे कुत्र्याची काळजी घेतात. हे ही वाचा-कोणी रस्त्यात बसून रडतयं, कोणाला पोलिसांनी उचलून गाडीत टाकलं, पाहा इंदूरचा VIDEO व्हायरल झाला व्हिडीओ रिचर्ड आणि मगरीसोबतचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ फुटेजमध्ये रिचर्ड विलबँक्सला तलावात आपल्या 3 महिन्यांचा छोटा कुत्रा चार्ट स्पाइनल Cavalier King Charles Spaniel) ला वाचविण्यासाठी मगरीविरोधात संघर्ष करीत असल्याचे दिसत आहे. मगरीच्या तोंडून कुत्र्याला बाहेर काढणं सोपं नव्हत Wilbanks ने सांगितलं की, मगरीला पकडणं इतकं अवघड नव्हतं, मात्र तिचं तोंड उघडणं आणि त्यातून कुत्र्याला बाहेर काढणं खूप कठीण होतं. एका मुलाखतीदरम्यान विलवँक्सने सांगितलं की, आम्ही तलावाशेजारी वॉक करीत होतो. मगर एका मिसाइलप्रमाणे पाण्याच्या बाहेर आली आणि कुत्र्याला पकडलं. मी कधी विचार केला नव्हता की मगर इतक्या जलद गतीने बाहेर येऊन कुत्र्याला पकडेल. हे सर्व खूप वेगाने झालं. त्यानंतर रिचर्ज आपल्या कुत्र्याला पशू चिकित्सकाकडे घेऊन गेला. त्याच्या पोटाला जखम झाली होती. कुत्र्याचा हा व्हिडीओ पाहून इज्राइलच्या पंतप्रधानानीही प्रतिक्रिया दिली आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published: