• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • नियंत्रण सुटलेल्या गाडीसमोर अचानक आला 4 वर्षांचा मुलगा; वडिलांनी डोकं लावलं आणि...Shocking Video

नियंत्रण सुटलेल्या गाडीसमोर अचानक आला 4 वर्षांचा मुलगा; वडिलांनी डोकं लावलं आणि...Shocking Video

सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील.

 • Share this:
  सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील. हा व्हिडिओ रशियातील एका (Russia) दुकानाबाहेरील आहे. या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलं आहे की, एक अनियंत्रित झालेली कार कशा प्रकारे एका मुलाच्या दिशेने येत होती, तेव्हा वडिलांनी आपलं डोकं लावलं आणि 4 वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला. ही घटना 14 एप्रिल रोजी सेंट पीटरबर्गमध्ये (St Petersburg) घडली होती. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कशा प्रकारे जलद गतीने जाणारी कार अचानक मागच्या दिशेने जाऊ लागली. जशी जशी गाडीची गती वाढली, कार चालकाने नियंत्रण गमावलं आणि आजूबाजूच्या गाड्यांना टक्कर देण्यापासून वाचू लागला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. स्टोअरच्या बाहेर उभे असलेल्या एका 4 वर्षांच्या बाळाला त्याच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत वाचवलं आहे. हे ही वाचा-'मी मरेन पण कुत्र्याला मरू देणार नाही!'; कोरोनाच्या संकटात भावुक करणारा VIDEO अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत मुलावरील धोका लक्षात घेऊन जोरात खेचलं आणि त्याचा जीव वाचवला. हा व्हिडिओ आतापर्यंत 12 हजार हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक या व्हिडिओवर कमेंट करीत आहेत आणि मुलाला जीव वाचविणाऱ्या वडिलांचं कौतुक करीत आहेत. यापूर्वी 2016 मध्ये अमेरिकेतील एका वडिलांना सुपरहिरो म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. मुलाला वाचविण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला होता.
  Published by:Meenal Gangurde
  First published: