या बिनकामाच्या गोष्टीतून तिनं शिवले फॅशनेबल ड्रेस, सोशल मीडिया झाला लुकवर फिदा!

या बिनकामाच्या गोष्टीतून तिनं शिवले फॅशनेबल ड्रेस, सोशल मीडिया झाला लुकवर फिदा!

कल्पनाशक्ती लढवली तर अनेक बिनकामाच्या वाटणाऱ्या गोष्टीतून कमाल काहीतरी तयार करता येऊ शकतं.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 16 जानेवारी : 'टाकाऊपासून टिकाऊ' असं आपण म्हणत असलो तरी तसं वागतोच असं नाही. अमेरिकेतल्या (united states of America) कॅलिफोर्निया इथं मात्र याचं एक सुंदर उदाहरण समोर आलं आहे.

झालं असं, की एक 22 वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव एरियल. ही एरियल शिकते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया इथं. तिनं घरात ठेवलेल्या पिशव्यांचा उपयोग चक्क कपडे (dresses) बनवण्यासाठी केला. हे कपडे घालून ती मिरवलीदेखील!

दैनिक भास्करनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या अनुभवाबाबत बोलताना एरियल म्हणाली, की लॉकडाऊनच्या (lock down) काळात तीसुद्धा अनेकांप्रमाणे कंटाळली होती. मात्र या कंटाळ्यातूनच काहीतरी नवं आणि चांगलं करण्याची इच्छा तिच्या मनात जागी झाली.

याबाबत मैत्रिणीशी (friend) बोलल्यावर मैत्रिणीनं एरियलला शॉपिंग बॅग (shopping bag) वापरून फॅशनेबल (fashionable) कपडे शिवण्याचा मार्ग सुचवला. एरियलला तिनं हे मजेमजेत सुचवलं होतं. पण एरियलनं मात्र हे गांभीर्यानं घेत काही महिन्यांतच बॅग्ज वापरत तब्बल पाच ड्रेसेस बनवले. तेही एकदम आकर्षक!

हे ड्रेसेस बनवायला एरियलनं वॉलमार्ट, टारगेट, वेन्स आणि ट्रेडर या ब्रँड्सच्या बॅग्ज वापरल्या. प्रत्येक बॅगला योग्य ठिकाणी कापून घेतलं. त्यानंतर तिनं आपल्या फिटिंगप्रमाणं एकदम मापात या बॅग्ज शिवल्या. शिवाय उरलेल्या कपड्यातून एरियलनं सुंदर एक्सेसरीजही बनवल्या.

एरियलला या प्रयोगातून लोकांना दाखवून द्यायचं होतं, की एखाद्या गोष्टीला आपण वापरून सहज फेकून देतो. मात्र त्यातून कितीकाही उपयोगी आणि अनोखं काहीतरी बनू शकतं. याशिवाय रग्ज बनवायलाही या बॅग्ज उपयोगात येऊ शकतात असं ती म्हणते. सोशल मीडियावर (social media) लोक तिच्या प्रयोगाला भरभरून दाद देत आहेत. अनेकांनी तर तिला असा ड्रेस डिजाईन करून देण्याची ऑफरही दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: January 16, 2021, 11:26 PM IST

ताज्या बातम्या