मराठी बातम्या /बातम्या /Viral /99 टक्के लोकांना या फोटोमध्ये दिसले फक्त 5 घोडे; चाणाक्ष नजरेला दिसतील 7

99 टक्के लोकांना या फोटोमध्ये दिसले फक्त 5 घोडे; चाणाक्ष नजरेला दिसतील 7

सध्या एक भन्नाट फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनेक घोडे (Horse Photo) आहेत. लोकांना हे घोडे शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.

सध्या एक भन्नाट फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनेक घोडे (Horse Photo) आहेत. लोकांना हे घोडे शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.

सध्या एक भन्नाट फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनेक घोडे (Horse Photo) आहेत. लोकांना हे घोडे शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.

   मुंबई, 24 डिसेंबर-  आपल्यापैकी अनेकांची सोशल मीडियावर   (social media)   अकाऊंट्स असतील. दिवसातील बराचसा वेळ आपण विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवत असाल. काहींना तर जवळपास त्याचं व्यसन लागल्यासारखच आहे. दिवसभर ते सोशल मीडियावर असतात. कारण सध्याच्या काळात सोशल मीडिया हा टाईमपासचा  (Time pass)   मुख्य पर्याय बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या गमतीशीर व्हिडिओंसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज्  (Tricky Viral Photo)   देखील याठिकाणी व्हायरल होतात. आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्यानिमित्त टाईमपास करण्यासाठी काही ट्रिकी फोटो शेअर केले जात आहेत. लोकदेखील आपापल्या कुटुंबियांसोबत बसून हे फोटो निरीक्षणाचं काम करत आहेत.

  सध्या असाच एक भन्नाट फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनेक घोडे (Horse Photo) आहेत. लोकांना हे घोडे शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. हा फोटो ऑप्टिकल इल्यूजनचं (Optical illusion) भन्नाट उदाहरण आहे. घोड्यांचा हा फोटो समजण्यासाठी फार कठीण आहे त्यामुळं अनेकांना आपल्या डोक्याला ताण द्यावा लागत आहे. अगदी काळजीपूर्वक पाहिल्यानंतरही लोकांना या चित्रात नेमके किती घोडे आहेत? याचं उत्तर सापडत नाही.

  किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थ (Kids Environment Kids Health) या अमेरिकन साइटवर हा घोड्यांचा फोटो अपलोड करण्यात आला आहे. फोटोसोबत नागरिकांना, त्यात किती घोडे आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. हा अतिशय साधा प्रश्न आहे. मात्र, या फोटोकडे काळजीपूर्वक पाहिलं की जास्त गोंधळ उडतो. 99 टक्के लोकांना या फोटोमध्ये पाच घोडे दिसत आहेत पण, हे उत्तर चुकीचं आहे.

  (हे वाचा:कसं शक्य आहे? KitKat Chocolate ने कापला टोमॅटो; VIDEO पाहून नेटिझन्स हैराण )

  फोटोसोबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तरही वेबसाइटवर देण्यात आलं आहे. किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थनुसार या चित्रात एकूण 7 घोडे लपलेले आहेत. यापैकी पाच घोडे स्पष्ट दिसत आहेत, तर इतर दोघांपैकी एकाचं डोके आणि एकाचं शरीर दिसत आहे. अशाप्रकारे एकूण 7 घोडे यामध्ये लपलेले आहेत. वेबसाइटनुसार, जर तुम्हाला त्यात 7 घोडे दिसले तर समजून जा की तुम्ही पझल एक्सपर्ट (Puzzle Expert) आहात.मुलांच्या ग्रोथ इयर्समध्ये त्यांना अशा प्रकारचे पझल्स सोडवायला दिले तर त्यांची बुद्धीमत्ता कुशाग्र होण्यास मदत होते. अशा अनेक वेबसाईट्स आहेत, ज्या मुलांसाठी विविध प्रकारचे पझल्स तयार करतात. सोशल मीडियामुळं लहान मुलांसोबतच मोठ्या लोकांचं देखील चांगलं मनोरंजन होत आहे.

  First published:

  Tags: Photo viral