Home /News /viral /

'एक विवाह ऐसा भी'! 90 वर्षीय वृद्धानं केलं 75 वर्षाच्या महिलेसोबत लग्न, कारणही आहे अनोखं

'एक विवाह ऐसा भी'! 90 वर्षीय वृद्धानं केलं 75 वर्षाच्या महिलेसोबत लग्न, कारणही आहे अनोखं

90 वर्षीय वृद्धानं आणि 75 वर्षीय महिलेनं नुकतीच लग्नगाठ बांधली (Old Couple Ties Knot). या विवाहाची (Unique Marriage) चर्चा सगळीकडेच रंगली आहे

    लखनऊ 06 सप्टेंबर : असं म्हणतात की जोडीदाराशिवाय आयुष्य काढणं फार कठीण असतं. असं आयुष्य जगणं अत्यंत कठीण असतं कारण यात एकटेपणाची जाणीव होत राहते. मग वय काहीही असो. याच गोष्टीचा प्रत्यय दिला, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लग्नगाठ बांधलेल्या 90 वर्षीय वृद्धानं आणि 75 वर्षीय महिलेच्या विवाहानं (Old Couple Ties Knot). वृद्ध नवरदेव शफी अहमद यांच्या या विवाहाची (Unique Marriage) चर्चा सगळीकडेच रंगली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जनपद रामपूर येथील भोट ठाणा क्षेत्रातील नरखेडी येथील निवासी असलेल्या शफी अहमद यांनी पाच मुली आहेत. अनेक वर्षांपूर्वी शफी यांच्या पत्नीचं निधन झालं. आता ते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना गावातच किराणा दुकान चालवून आपला वेळ घालवत आहेत. वडिलांचा एकटेपणा पाच विवाहित मुलींना पाहावत नव्हता. यामुळे सर्वांनी मिळून ठरवलं की वडिलांचा संसार पुन्हा एकदा सुरू करू देता येईल. सर्वांच्या सहमतीनं झालेल्या या निर्णयानंतर 75 वर्षांच्या एका महिलेशी या वृद्धाचं लग्न लावण्यात आलं आणि त्यांच्या जीवनात आनंद परत आला. चक्क कुत्र्यानं वाचवला माशाचा जीव; हा VIRAL VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं 90 वर्षीय शफी अहमद यांनी म्हटलं, की हे लग्न त्यांनी स्वतःच्या भल्यासाठी केलं आहे. पाचही मुलींचं लग्न झालं आहे आणि त्या सर्व आपल्या आपल्या घरी राहत आहेत. त्यांना मुलंही आहेत. अशात इकडे दररोज काय घडतं, याची त्यांना माहितीही होत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी बघता आणि आपल्या आयुष्यातील अडचण दूर करण्यासाठी लग्न केलं. नवरी चांगली आहे. सरकारनं आम्हाला थोडी फार मदत केली तर आणखीच चांगलं होईल. 75 वर्षीय नवरी आयशा यांनी म्हटलं, की या वयात माझी मदत करणारं कोणीच नसल्यानं मी लग्न केलं. खाण्या पिण्यापासून फिरण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत अडचणी येत असल्यानं लग्न केलं. घरही वाईट अवस्थेत आहे. माझी मुलगीही या निर्णयामुळे खूश आहे, असंही त्यांनी सांगितलं. ...अन् 20 फूट अजगरानं तीन वेळा केला हल्ला; हादरवून टाकणारा Video आला समोर 90 वर्षीय नवरदेवाची मुलगी शकीला हिनं म्हटलं, की आम्हीही चिंतेत होतो. घरून वारंवार त्यांच्याकडे येऊही शकत नव्हतो. याच कारणामुळे पाचही बहिणींनी मिळून हा निर्णय घेतला आणि आपल्या वडिलांचं लग्न लावलं. मुलींनी अगदी हौसेनं नवरीसाठी कपडे आणि दागिने आणत हे लग्न लावून दिलं. हे अनोखं लग्न सध्या गावात चर्चेचा विषय ठरत आहे. गावकऱ्यांनीही त्यांच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Marriage, Viral news

    पुढील बातम्या