नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : मित्र-मैत्रीणींमध्ये कायम पैज ठेवल्या जातात. मात्र कधीकधी ही पैज पूर्ण करण्यासाठी लोकं कोणत्याची थराला जातात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गर्भवती महिलेनं अशीच एक अट पूर्ण करण्यासाठी जीव धोक्यात घातला. 9 महिन्यांची गर्भवती या महिलेनं जोखीम घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
युट्यूबवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की मायकेल मायलर नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीसमोर अट ठेवली होती की तिने नवव्या महिन्यात 8 मिनिटांत एक मैल धावून दाखवावे. पत्नीनेही हे आव्हान स्वीकारलं आणि करून 8 मिनिटांत एक मैल धावली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
वाचा-क्षणात उद्धवस्त करणार शक्तीशाली BRAHMOS सुपरसॉनिक मिसाइल, पाहा VIDEO
वाचा-PPE सूट घालून 'घुंघरू'वर धरला ताल; डॉक्टरच्या भन्नाट डान्सचा VIDEO एकदा पाहाच
मायकल मायलरच्या पत्नीने आपल्या 9 व्या महिन्याच्या गरोदरपणात 1.6 किमी धाव फक्त 5.25 मिनिटांत पूर्ण केली. ही कृती पाहून तिच्या नवऱ्यासह सर्वांनाच आश्चर्य वाटले. तिचा नवरा मायलरनं पत्नीसोबत 100 डॉलर्सची पैज लावली होती.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जीव धोक्यात टाकल्यामुळे टीका केली आहे. तर, काहींनी तिचे कौतुकही केले आहे.