मराठी बातम्या /बातम्या /Viral /81 वर्षीय महिलेनं तिच्या मुलांपेक्षाही लहान असणाऱ्या तरुणाशी केला विवाह, पण 'या' कारणामुळे होत नाहीये भेट

81 वर्षीय महिलेनं तिच्या मुलांपेक्षाही लहान असणाऱ्या तरुणाशी केला विवाह, पण 'या' कारणामुळे होत नाहीये भेट

ब्रिटनमधील 81 वर्षीय आयरिस जोन्स (Iris jones) आणि 36 वर्षीय मोहम्मद अहमद इब्राहिम (Mohammed Ahmed Ibriham) हे दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मोहम्मद हा आयरिशपेक्षा सुमारे 45 वर्षांनी लहान आहे.

ब्रिटनमधील 81 वर्षीय आयरिस जोन्स (Iris jones) आणि 36 वर्षीय मोहम्मद अहमद इब्राहिम (Mohammed Ahmed Ibriham) हे दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मोहम्मद हा आयरिशपेक्षा सुमारे 45 वर्षांनी लहान आहे.

ब्रिटनमधील 81 वर्षीय आयरिस जोन्स (Iris jones) आणि 36 वर्षीय मोहम्मद अहमद इब्राहिम (Mohammed Ahmed Ibriham) हे दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मोहम्मद हा आयरिशपेक्षा सुमारे 45 वर्षांनी लहान आहे.

लंडन, 08 जानेवारी: असं म्हटलं जात की, प्रेम हे धर्म, जात आणि वय पाहून होत नसतं, ते कुणाशीही आणि कधीही होऊ शकतं. हे ब्रिटनमधील (Britain) 81 वर्षीय महिला (81 year old woman) आणि इजिप्तमधील 36 वर्षीय तरूणाच्या ( 36 year old young man) प्रेम कहाणीने (Love story) पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ब्रिटनमधील 81 वर्षीय आयरिस जोन्स (Iris jones) आणि 36 वर्षीय मोहम्मद अहमद इब्राहिम (Mohammed Ahmed Ibriham) या दोघांनी काही दिवसांपूर्वी लग्न लग्न केलं. मोहम्मद हा आयरिशपेक्षा सुमारे 45 वर्षांनी लहान आहे, पण दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. आता दोघांच्या प्रेमात एक समस्या उद्भवली आहे.

खरंतर व्हिसाच्या अडचणीमुळे हे दोघं आता एकमेकांना भेटू शकत नाहीत. आयरीस ब्रिटनमध्ये राहते तर मोहम्मद इजिप्तमध्ये राहतो. असं असतानाही मोहम्मद आपल्या प्रेयसीची आठवण काढत असतो. तिच्याबद्दल सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट लिहित असतो.

(हे वाचा-Capitol Hill Violence: चीन आणि रशियानं केली अमेरिकेची थट्टा, म्हणाले...)

आयरिसही वारंवार मोहम्मदची आठवण काढत असते. आयरिसने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, काही काळ ती मोहम्मद शिवाय व्यवस्थित राहते, पण कालांतराने मला मोहम्मदची आठवण आल्यानंतर रडू कोसळतं. अशावेळी मी त्याच्या विरहात खुप रडते.

आयरीसला दोन मुलं आहेत!

आयरीसच्या म्हणण्यानुसार, ती तीन वेळा मोहम्मदला भेटण्यासाठी इजिप्तला गेली आहे. परंतु मोहम्मदला यूकेचा व्हिसा मिळविण्यात अडचणी येत आहे. त्यामुळं तो ब्रिटनला जाऊ शकत नाही. तर दुसरीकडे आपल्या तब्येतमुळं आयरिसला इजिप्त मानवत नाही. त्यामुळं ती पुन्हा इजिप्तला जाऊ शकली नाही. अशा परिस्थितीत आयरिस सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्यांना एक मुलगा 54 वर्षांचा आहे, तर दुसरा मुलगा 53 वर्षांचा आहे.

(हे वाचा-मेड इन चायना कोरोना लशीचे 73 Side effect; चिनी डॉक्टरनंच केली पोलखोल)

मोहम्मद अगदी तरूण असल्यानं आयरिसच्या दोन्ही मुलांना त्यांच्या लग्नाबद्दल राग होता. त्यांचा या दोघांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी आयरीससोबत सर्व नाते तोडले होते. पण आता त्यांच्या नात्यातला हा राग निवळला आहे. आयरिसनं एका टीव्ही मुलाखतीदरम्यान तिच्या आणि मोहम्मदच्या अत्यंत वैयक्तिक आयुष्याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. त्यामुळं या दोन्ही मुलांना लज्जास्पद वाटलं होतं.

First published:

Tags: Love story