वॉशिंग्टन, 03 ऑगस्ट : आपल्या घरात, दुकानात किंवा बँकेत असताना अचानक चोर, दरोडेखोर समोर आले तर आपलं काय होईल... साहजिकच आपल्या घाम फुटेल. त्यांच्या हातात शस्त्र असेल तर जागेवरून हलण्याचीही हिंमत आपण करणार नाही. त्यावेळी नेमकं काय करावं ते कुणालाच सुचत नाही. पण एका 80 वर्षांच्या आजोबांनी मात्र एका वारातच दरोडेखोरांचा खेळ खल्लास केला आहे. दुकान लुटायला आलेले दरोडेखोर आल्या पावल्यांनी आपला जीव मुठीत धरून पळाले (80 year old shop owner shoots robber).
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील एका दुकानातील दरोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सशस्त्र दरोडेखोर एका दारूच्या दुकानात घुसले. त्या दुकानाचा मालक तिथं होता पण हा मालक म्हणजे 80 वर्षांचा म्हातारा. आता जिथं सशस्त्र दरोडेखोरांसमोर तरुणांची हवा टाईट होते तिथं या म्हाताऱ्याचा काय टिकाव लागणार असा विचार तुम्ही कराल. या दरोडेखोरांनाही तसंच वाटलं असेल. पण आजोबांनी मात्र असं काही केलं की दरोडेखोर दुकान लुटणं दूर आधी आपला जीव वाचवू लागले. दुकान लुटायला आले पण दुकान न लुटताच ते पळाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे वाचा - OMG! लुंगी घातलेल्या 64 वर्षांच्या आजोबांनी असं काही केलं की समोर उभा तरुणही शॉक; VIDEO पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल
व्हिडीओत पाहू शकता तोंड झाकलेला दरोडेखोर हातात बंदूक घेऊन घुसतो. समोरच गल्ल्यावर उभा असलेल्या 80 वर्षांच्या वृद्ध मालकासमोर तो बंदूक धरतो. पण वृद्ध मालक घाबरत नाही. तोसुद्धा दरोडेखोरासमोर छाती ताणून उभा राहतो आणि आपल्याजवळील बंदूकही त्या दरोडेखोरावर ताणतो. दरोडेखोर तर फक्त बंदूक दाखवून त्या वृद्धाला घाबरवतो. पण वयस्कर व्यक्ती मात्र थेट गोळीच झाडतो. जी त्या दरोडेखोराच्या हाताला लागते. जसा तो आत येतो तसाच तो काही क्षणात दुकानातून पळ काढतो.
त्याने माझ्या हातावर गोळी झाडली असं ओरडतच तो दुकानातून बाहेर पडतो. बाहेर एक काळ्या रंगाची गाडी आहे, ज्यात त्याचे साथीदार आहेत. त्यापैकी एक साथीदारही त्याच्या मागून दुकानात घुसण्याच्या तयारीतच असतो पण गोळीचा आवाज ऐकून आणि साथीदाराला ओरडत बाहेर पडताना पाहून तोसुद्धा घाबरतो. दोघंही घाईघाईत गाडीत बसतात आणि सर्वजण तिथून गाडी घेऊन फरार होतात.
हे वाचा - स्टंट करता करता रस्त्यावर कोसळला, बाईकने फरफटत नेलं; अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO
@incarceratedbob ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून आजोबांच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. त्यांचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.