मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; 75 वर्षाच्या आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL

भल्या भल्या अभिनेत्रींना टाकेल मागे; 75 वर्षाच्या आजीबाईचा जबरदस्त डान्स VIDEO VIRAL

Viral Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका आजीबाईचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. आतापर्यंत अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 मे: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल (Social media viral video) होत असतात. यातील काही व्हिडिओ आपलं तेवढ्यापुरतं मनोरंजन करतात. तर काही व्हिडिओ आपल्याला अवाक करून विचार करायला भाग पाडतात. पण सोशल मीडियावर एखादाच व्हिडिओ असा असतो, जो आपलं मन कायमचं जिंकतो. असाच एक मन जिंकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक आजी स्वतःमध्ये हरवून मनमुराद डान्स (grand mother dance video) करत आहेत. निखळ मनानं डान्स करणाऱ्या या आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

संबंधित आजीचं वय साधारणतः 70 ते 75 च्या दरम्यान आहे. एवढं वय असणाऱ्या इतर लोकांना नीट जागचं हालताही येत नाही. पण या आजी चक्क लग्नात तुफान डान्स (Grand mother dance in marriage) करत आहेत. अगदी तरुण मुलीनं डान्स करावं, अशी लचक त्यांच्या नृत्यात दिसत आहे. खरंतर ग्रामीण भागातल्या नृत्य कलेचा लोप पावत असताना, आजीचा हा डान्स व्हिडिओ अनेकांना सुखावणारा आणि निखळ आनंद देणारा ठरत आहे.

" isDesktop="true" id="551499" >

त्यांचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या आजीची तुलना बॉलिवूडमधील अभिनेत्र्यांशी केली आहे. आजीच्या या व्हिडिओला आतापर्यंत 8 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं तर तर अनेकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

हे ही वाचा-विषारी साप पकडता पकडता अचानक लुंगी सोडली आणि...; VIDEO पाहून लोक झालेत हैराण!

यापूर्वीही सोशल मीडियावर एका आजोबाचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी संबंधित आजोबा एका जत्रेच्या ठिकाणी डान्स करत असताना. पाठीमागून आजी दांडकं घेऊन आल्याचं पाहून आजोबांनी धूम ठोकली होती. तो व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.

First published:

Tags: Dance video, Video viral