• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सर आली धावून, Building गेली वाहून! काही क्षणांत कोसळली सात मजली इमारत, पाहा VIDEO

सर आली धावून, Building गेली वाहून! काही क्षणांत कोसळली सात मजली इमारत, पाहा VIDEO

पावसामुळे कमकुवत झालेली एक सात मजली (7 floor building collapsed like cards) इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

 • Share this:
  शिमला, 6 ऑक्टोबर : पावसामुळे कमकुवत झालेली एक सात मजली (7 floor building collapsed like cards) इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ही इमारत धोकादायक झाली होती. इमारत (Dangerous building collapsed) कुठल्याही क्षणी कोसळू शकते, याची कल्पना असल्यामुळे ती अगोदरच (Building was emptied before collapse) रिकामी करण्यात आली होती. ही इमारत कोसळत असतानाचा (Viral video of building collapse) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अशी कोसळली इमारत हिमाचल प्रदेशची राजधानी असणाऱ्या शिमल्यात 7 मजल्यांची इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. कशा प्रकारे काही क्षणांत ही इमारत जमीनदोस्त झाली, याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इमारत पडत असताना शेजारच्या उंच इमारतीवरून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. या इमारतीत अनेक कुटुंब राहत होती. मात्र इमारत धोकादायक झाल्याचं लक्षात आल्यामुळे त्यांना इतरत्र हलवण्यात आलं होतं. या इमारतीची अवस्था इतकी खराब झाली होती की त्या इमारतीत राहणाऱ्यांना ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते, याची जाणीव होत होती. त्यामुळे जीवाच्या भीतीने नागरिकांनी अगोदरच ही जागा सोडली होती. प्रशासनाच्या देखरेखीखाली पडली इमारत ही इमारत पडत असताना नगरपालिकेचे अधिकारी आणि तंत्रज्ञ घटनास्थळी उपस्थित होते. इमारतीच्या आजूबाजूच्या नागरिकांनाही काही काळ घराबाहेर पडण्याची सूचना देण्यात आली होती. ही इमारत कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्याचा काही भाग इतर इमारतींना धडकला. पावसासोबत वेगाने वाहत आलेले दगडगोटे धडकल्यामुळे काही इमारतींचं नुकसान झालं आहे, तर काही घरांच्या भिंतींना तडेही गेले आहेत. हे वाचा - क्रूझ ड्रग्ज पार्टीच्या कारवाईत नवा ट्विस्ट, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट इमारत अवैध असल्याबाबत साशंकता ही इमारत अवैध होती का, याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र अवैध असण्याबाबत आतापर्यंत एकही नोटीस या इमारतीला पालिकेकडून देण्यात आली नव्हती.
  Published by:desk news
  First published: