एका प्रेमाची गोष्ट! 67 वर्षांचा नवरा, 65 वर्षांची नवरी; वृध्दाश्रमातून निघाली वरात

एका प्रेमाची गोष्ट! 67 वर्षांचा नवरा, 65 वर्षांची नवरी; वृध्दाश्रमातून निघाली वरात

प्रेमाला वय नसतं असे म्हणतात. हे फोटो पाहून तुमचा प्रेमावरचा विश्वास वाढेल.

  • Share this:

कोचनियान, 29 डिसेंबर : प्रेमाला वय नसतं असं म्हणतात, ते खरेच आहे. कारण प्रेम कोणत्याही वयात आणि कोणत्याही क्षणी होऊ शकते. मात्र वयाच्या 67व्या वर्षी प्रेमात पडून लग्न करण्याची धमक दाखवणारे फार कमी असतात. मात्र कोचनियान येथील मेनन आणि लक्ष्मी अम्माल या जोडप्यानं हे करून दाखवले. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील रामवरमपुरम येथील सरकारी वृद्धाश्रमात भेटलेलं हे जोडपं आता लग्नबंधनात अडकले.

मेनन आणि लक्ष्मी दोघे पहिल्यांदा वृद्धाश्रमात भेटले आणि त्यांचा विवाह झाला. या लग्नात वर म्हणजेच कोचनियन मेनन 67 वर्षांचे आणि लक्ष्मी अम्माल 65 वर्षांचे असून दोघेही शनिवारी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत. राज्याचे कृषिमंत्री व्ही. एस. सुनील कुमार यांनीही या सोहळ्यास हजेरी लावली आणि त्यांनीच कोचीनियात लक्ष्मी अम्मालच्या लग्नाची मागणी घातली.

वाचा-सावधान! पोलिसांची सोशल मीडियावर वक्रदृष्टी, फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट

मेनन आणि लक्ष्मी 30 डिसेंबर रोजी लग्न ठरले होते, परंतु नंतर लग्न आधीच करण्यात आले. लग्नादिवशी लक्ष्मी अम्मालने लाल रेशमी साडी व्यतिरिक्त तिच्या केसांमध्ये भरपूर दागिने आणि चमेलीची फुले लावली. विवाहसोहळ्यादरम्यान कोचानियनने पारंपारिक कपडे घातले होते आणि ते मुंडू आणि शर्टमध्ये दिसले होते. येथे आपण या दोघांची काही छायाचित्रे पाहू शकता.

वाचा-तरुणाने तब्बल 2 कोटींची आलिशान मर्सिडीज कार हेलिकॉप्टरने दिली फेकून, VIDEO

वाचा-इच्छाशक्तीला सलाम! दिव्यांग मुलाची बॅटिंग पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

याबाबत बोलताना वृद्धाश्रमांचे अधीक्षक जयकुमार म्हणाले की, शुक्रवारी संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम झाला. ते म्हणाले, "आम्ही मंडपांची व्यवस्था केली होती आणि दोघांनी सकाळी 11 वाजता लग्न केले." सोहळ्याची सांगता भव्य साधनेने झाली.

कृषिमंत्री व्ही. एस. सुनील कुमार यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. कोचनियन आणि लक्ष्मी अम्मालच्या लग्नाचा साक्षीदार होणे नेहमीच एक अविस्मरणीय अनुभव असेल. व्यवस्थापन, समाजसेवक, इतर आणि हितचिंतकांनी लग्न संस्मरणीय केले. राज्य वृद्धाश्रमातील हे पहिले लग्न आहे. 67 वर्षीय वरा आणि 65 वर्षाची वधू मंडपममध्ये प्रवेश करताना आनंददायक आणि उत्साही दिसत होती. त्यांचे विवाहित जीवन सुखी आणि शांत रहावे अशी माझी मनापासून इच्छा आहे', असे सांगत या दोघांना शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या