सूरत, 25 जानेवारी : गुजरातमधील (Gujarat) सूरत (Surat) येथील एक शेतकऱ्याची भलतीच व्यथा समोर आली आहे. हा शेतकरी सातव्यांदा लग्न करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी तो पत्नीचा शोध घेत आहे. त्यात त्याला ह्रदयविकार आहे. शिवाय मधुमेह आणि अन्य आजारांनी ग्रासलं आहे. मात्र त्याला या आजाराची चिंता नाही, मात्र त्याच्या सहाव्या पत्नीने मात्र त्याला हैराण करुन सोडलं आहे. त्याची सहावी पत्नी त्याच्याहून 21 वर्षांनी लहान आहे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सहावी पत्नी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यात नकार देते. त्यामुळे चिंताग्रस्त शेतकरी सहाव्या पत्नीला सोडण्यासाठी सातव्यांना लग्न करण्याच्या तयारीत आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लोकांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत होती. त्यावेळी येथील 63 वर्षांचा शेतकरी अय्यूब देगियाने सहावं लग्न केलं होतं. यानंतर डिसेंबर महिन्यात तो पत्नीपासून वेगळा झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार देगियाचं म्हणणं आहे की, मला पत्नीची गरज आहे. माझी सहावी पत्नी माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवू इच्छित नाही. त्याचं म्हणणं आहे की, मला इतके आजार आहेत. तिला वाटतं तिलाही हा त्रास सुरू होईल. मला ह्रदयाचा आजार आहे, शिवाय मधुमेह आणि अनेक त्रास आहेत.
हे ही वाचा-'पत्नी पळून गेली तर विसरून जा, दुसरीचा शोध घ्या'; न्यायाशीधांनी दिला सल्ला
देगियाची पहिली पत्नीदेखील त्याच गावात राहते. तिला पाच मुलं आहेत. देगियाच्या सहाव्या पत्नीचं वय 42 वर्षे आहे. ती विधवा होती. तिने देगियाबाबत माहिती काढली तर असं कळलं की ती त्यांची सहावी पत्नी आहे. यामुळे तिला जबरदस्त धक्काच बसला. देगियांनी याबाबत सहाव्या पत्नीला काहीच सांगितलं नव्हतं. यानंतर सहाव्या पत्नीने देगियांविरोधात तक्रार दाखल केली. तिचं म्हणणं आहे की, देगियाने पाच महिलांपेक्षा अधिक जणांसोबत लग्न केलं आहे. मात्र त्यांनी मला याबाबत काहीच सांगितलं नाही. आता मला सोडल्यानंतर ते कोणा दुसऱ्या महिलेसोबत राहत आहे. त्यांची पहिली पत्नीदेखील जिवंत आहे. मला काही गावकऱ्यांनी सांगितलं की, ते काही महिन्यांपर्यंत महिलांसोबत संबंध ठेवतात, आणि नंतर त्यांना सोडून देतात.
हे ही वाचा-रिसॉर्टमध्ये गेलेल्या कुटुंबासोबत भीषण प्रकार; टेन्टमध्ये होता मुक्काम, अचानक...
पोलीस ठाण्यातील इन्वेस्टिगेशन अधिकारी अस्मिता पार्गी यांनी सांगितलं की, देगिया यांनी सांगितलं की, तो त्या महिलेसोबत राहू इच्छित नाही. ती त्याच्या शारिरीक गरज पूर्ण करीत नाही. आता दोन्ही पक्षांचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.