नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : आपला छंद (hobby), आपली पॅशन (passion) जोपासण्यासाठी वय नसतं असं म्हणतात. हा विचार काही लोक आपल्या जगण्यातून खरा करून दाखवतात. अशाच एक आजी सध्या इंटरनेटवर तुफान लोकप्रिय (sensation on internet) झाल्या आहेत.
या आजीचं वय आहे 62 वर्ष. नाव आहे रवी बाला. सोशल मीडियावर त्यांना ओळखलं जातं ते 'डान्सिंग दादी' म्हणून. रवी बाला यांचे इन्स्टाग्रामवर 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स (over 1 lack followers on Instagram) आहेत. आपल्या डान्सिंग टॅलेंटमुळं 9Dancing talent) या आजी आज अनेकांसाठी प्रेरणा बनल्यात.
केवळ सामान्य लोक नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्ससुद्धा (Bollywood celebrities) आजींचे चाहते आहेत. नृत्य ही या आजींची बालपणापासूनची पॅशन. शाळा आणि कॉलेजात आजींनी डान्स स्पर्धांमध्ये सतत भाग घेतला. मात्र लग्नानंतर त्यांच्या सासरी त्यांचं डान्स करणं कुणालाच पसंत नव्हतं. मग त्यांनी डान्स करणं सोडून दिलं होतं.
View this post on Instagram
रवी बाला सांगतात, 'मला लहानपणीपासूनच डान्स खूप आवडायचा. संधी मिळाली, की मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेत नाचू लागायचे. कॉलेजनंतर लग्न झालं. एकामागे एक जबाबदाऱ्या अंगावर पडत गेल्या. डान्स मागेच पडला. लग्नानंतर २७ वर्षांनी रवी यांच्या पतीचं कॅन्सरनं निधन झालं.
रवी मोठ्याच दुःखात बुडाल्या. या दुःखावर उपाय म्हणून त्यांनी पुन्हा एकदा डान्समध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचं ठरवलं. आता कुटुंबही त्यांच्यामागे उभं राहिलं. त्यांनी एका स्पर्धेत भाग घेतला. हा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला.
View this post on Instagram
आता रवी आपला व्हिडिओ नियमित सोशल मिडियावर टाकू लागल्या. ते व्हायरल झाले (video viral), त्यांचे फॉलोवर्स (followers)वेगानं वाढले. गायक-अभिनेता दिलजीत दोसांज (Diljit Dosanj), दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiyaz Ali), कोरिओग्राफर टेरेन्स लुईस अशा बड्या लोकांचं लक्षही या डान्सनं वेधलं. अनेक स्टार्सनी रवी यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले.
हेही वाचा'या' गोड चिमुकलीच्या फोटोत दडलंय काही तरी वेगळंच; वाचून व्हाल थक्क
या डान्सिंग दादी आज सोशल मीडिया सेन्सेशन आहेत. सर्व वयाच्या लोकांसाठी त्या जितीजागती प्रेरणा (Inspiration)बनल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Inspiring story, Instagram, Viral video.