मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! एका बाईकवर बसले 6 तरुण; पाहा, पोलिसांनी ‘कोंबडा’ बनवल्याचा VIDEO

OMG! एका बाईकवर बसले 6 तरुण; पाहा, पोलिसांनी ‘कोंबडा’ बनवल्याचा VIDEO

एकाच दुचाकीवर बसलेल्या 6 तरुणांना पकडून पोलिसांनी शिक्षा दिल्याचा (6 youth riding on bike video goes viral on social media) व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

एकाच दुचाकीवर बसलेल्या 6 तरुणांना पकडून पोलिसांनी शिक्षा दिल्याचा (6 youth riding on bike video goes viral on social media) व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

एकाच दुचाकीवर बसलेल्या 6 तरुणांना पकडून पोलिसांनी शिक्षा दिल्याचा (6 youth riding on bike video goes viral on social media) व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news

फतेहाबाद, 30 नोव्हेंबर: एकाच दुचाकीवर बसलेल्या 6 तरुणांना पकडून पोलिसांनी शिक्षा दिल्याचा (6 youth riding on bike video goes viral on social media) व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दुचाकी हे खरं तर दोघांनी बसण्याचं वाहन. दुचाकीवरून तीन व्यक्तींनी (More than 2 persons not allowed on two wheeler) प्रवास करणं हादेखील कायद्यानं गुन्हा आहे. मात्र आपल्याकडे सर्रास तिघे बसून बाईक चालवताना दिसतात. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेत तीन, चार किंवा पाचही नव्हे, तर तब्बल सहा जण एकाच बाईकवर बसल्याचं आढळलं. पोलिसही हा प्रकार पाहून चक्रावले आणि (Police warned youth) तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना शिक्षा दिली. " isDesktop="true" id="637275" >

तरुणांचा केला कोंबडा

हरियाणातील फतेहाबाद परिसरात अनेकदा तरुण मुलं टोळक्यानं येऊन तरुणींची छेड काढत असल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशा परिस्थितीत या तरुणांना आवर घालण्यासाठी ‘दुर्गा शक्ती’ नावाच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सकाळी आणि दुपारच्या वेळेला ही पथकं बस स्टँडच्या परिसरात तैनात करण्यात येतात आणि रोड रोमियोंवर ती लक्ष ठेऊन असतात.

एकाच बाईकवर सहा जण

दुपारच्या वेळेत दुर्गा शक्ती पथक बस स्टँड परिसरात तैनात असतानाच सहा युवक एकाच बाईकवर बसून आल्याचं त्यांना दिसलं. या पथकाने त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडलं आणि बस स्टँडवर नेलं. तिथे सर्वांसमोर त्यांना कोंबडा करून उभं केलं. मुळात एकाच बाईकवर सहा जण कसे बसले, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अंगकाठी बारीक असल्यामुळेच एका वेळी सहाजण बाईकवर बसू शकल्याचं दिसत होतं.

हे वाचा- VIDEO: चिडलेल्या बापाची मुलाला अमानुष मारहाण, तक्रारीनंतर पोहोचला तुरुंगात

जीवावर उदार होत ड्रायव्हिंग

एकाच बाईकवर सहा जणांनी बसून हे तरुण स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सहा जणानी बाईकवर बसणं आणि ती वेगानं चालवणं या प्रकारामुळे अपघाताची शक्यता असून स्वतःसोबत इतरांचाही जीव हे तरुण धोक्यात घालत होते. त्यामुळे त्यांना काही वेळ कोंबडा करायला पोलिसांनी लावलं आणि त्यानंतर समज देऊन घरी सोडलं. या प्रकारामुळे स्टंटगिरी करणाऱ्या इतर रोमियोंना धडा मिळेल आणि हे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Crime, Haryana, Police, Videos viral