मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! हे काय? चिमुकल्या लेकाच्या हाती लागलं असं खेळणं; पाहून वडिलही हादरले

बापरे! हे काय? चिमुकल्या लेकाच्या हाती लागलं असं खेळणं; पाहून वडिलही हादरले

कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या मुलाच्या हाती एक अशी वस्तू लागली. ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या मुलाच्या हाती एक अशी वस्तू लागली. ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या मुलाच्या हाती एक अशी वस्तू लागली. ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 07 ऑक्टोबर : लहान मुलं (Children playing) कधी, काय आणि कशासोबत खेळतील सांगू शकत नाही. त्यांच्या हाती जी वस्तू लागेल ती त्यांच्यासाठी खेळणंच असते. अशाच एका चिमुकल्याला असं खेळणं सापडलं, जे त्याच्या हातात पाहून वडिलांनाही धक्का बसला. चिमुकल्याच्या हातात एक दगडासारखी वस्तू होती पण प्रत्यक्षात मात्र तो दगड नाही, दुसरंच काहीतरी आहे हे जेव्हा समजलं तेव्हा त्याचं कुटुंबं हादरलं. अमेरिकेच्या (America) मिशिगनमधील (Michigan) ही घटना. 6 वर्षांचा जुलिअन गॅगनो  (Julian) गेल्या महिन्यात जुलिअन आपल्या कुटुंबासोबत डायनासोर हिल नेचर प्रिझर्व्हमध्ये (Dinosaur Hill Nature Preserve) फिरायला गेला होता. तिथं फिरताना त्याला एक मोठा दगड दिसला, तो त्याने आपल्या हातात घेतला. पण हा दगड सामान्य दगडाप्रमाणे नव्हता. त्यात काहीतरी विचित्र होतं. जुलिअनच्या वडिलांना तो दगड विचित्र वाटल्याने हा दगड नसून दुसरंच काहीतरी आहे, असा संशय आला. त्यांचा हा संशय खरा ठरला. हे वाचा - चिमुकली लेक खेळत होती असा खेळ; पाहून वडीलांना दरदरून फुटला घाम ज्युलिअनला सापडलेलं दगड नाही तर एक जीवाश्म होता (Fossil). मास्टोडोन्स (Mastodon) नावाच्या एका प्राण्याचा जबडा होता. त्या प्राण्याचा दात दिसत होता. ज्युलिअनला वाटलं हा ड्रॅगनचा दात असावा. मास्टोडोन्स हत्तींसारखेच दिसायचे. त्यांची उंची 9 फूट 5 इंच आणि वजन 11 टन असावं. तब्बल 12 हजार वर्षांपूर्वी हे प्राणी पृथ्वीवर होते. उत्तर आणि मध्य अमेरिकेत हे प्राणी असायचे. पण हजारों वर्षांपूर्वी ते गायब झाले होते. हे वाचा - भारीच! फक्त पँडल मारलं आणि चकाचक झाले कपडे; देशी Washing machine चा VIDEO ज्युलिअनने 12 हजार वर्षांपूर्वीचा जीवाश्म (12 Thousand Old Fossil Found) शोधून काढला होता (Weird Discovery).  ज्युलिअनच्या कुटुंबाने एका जीवाश्म एका संग्रहालयात दिला. म्युझियमच्या गाइडने सांगितलं की इतक्या वर्षांपूर्वीचं जीवाश्म इतक्या चांगल्या अवस्थेत पाहून कुणालाच विश्वास बसत नाही आहे. तज्ज्ञांच्या मते, हा शोध खूपच दुर्मिळ आहे. आता या जबड्याच्या मदतीने मास्टोडोन्सबाबत अधिक माहिती मिळेल.
First published:

Tags: America, Parents and child, Small child, Viral, Viral videos

पुढील बातम्या