तिरुवनंतपुरम, 04 नोव्हेंबर : रस्त्यावर एखादी बाईक किंवा कार असेल आणि तिथं शेजारीच आपण कुणाशी तरी गप्पा मारत असू किंवा उभे असू तर आपण नकळत त्या गाडीला टेकतो. असाच एक चिमुकला रस्त्यावर उभ्या असलेल्या एक गाडीला फक्त टेकला. यामुळे संतप्त झालेल्या कारचालकाने त्याला इतकी मोठी शिक्षा दिली की तुम्हालाही धक्का बसेल. हा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
केरळच्या थल्लासरी जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. अवघ्या 6 वर्षांचा हा चिमुकला आहे. त्याला पाहिल्यानंतर तो गरीब आणि रस्त्यावर राहणाऱ्यांपैकी दिसतो आहे. असंच रस्त्याशेजारी उभा तो उभा आहे, तिथंच एक कार पार्क केली आहे, ज्याला हा मुलगा टेकला आहे. काही वेळाने कारचा मालक तिथं येतो आणि त्याचं लक्ष आपल्या गाडीला टेकलेल्या त्या मुलाकडे जातो.
आता लहान मुलगा आहे किंवा त्याच्याशिवाय दुसरं कुणीही असं आपल्या गाडीला टेकलं तर सामान्यपणे आपण त्याला बाजूला हो म्हणू. पण या कार मालकाने तर हद्दच केली. त्याने या मुलासोबत जे केलं ते पाहून तुमच्याही तळपायातील आग मस्तकात जाईल. तुम्ही विचारही केला नसेल, असं या व्यक्तीने केलं आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहिला तर ही व्यक्ती त्या मुलाला बाजूला हो म्हणत नाही किंवा त्याचा हात धरून त्याला बाजूला करत नाही. तर थेट त्याच्या कमरेत जोरात लाथ मारतो आणि त्याच्यावर मोठमोठ्याने ओरडताना दिसतो आहे. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात व्यक्तीचं मुलासोबतचं संतापजनक कृत्य कैद झालं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हे वाचा - VIDEO - ती ढसाढसा रडत होती तरी तिचे हातपाय धरून तिला...; नवरीसोबत मंडपात धक्कादायक प्रकार
केरळमधील भाजप नेते के. सुरेंद्रन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सचा संताप संताप होतो आहे. एका युझरने यावर प्रतिक्रिया देताना या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. तर काहींनी याला जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे.
Police refused to register FIR and tried to protect the perpetrator. It was the natives who took the child to the hospital. This incident shook the conscience of the Keralites. Stringent action should be taken against the police officers who tried to downplay the issue. pic.twitter.com/xJwFJAQmZh
— K Surendran (@surendranbjp) November 4, 2022
एशियानेट न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, मुलाचे आईवडील मजूर आहे. राजस्थानहन ते इथं काम करायला आले आहेत. मुलाच्या कमरेला दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला लाथ मारणाऱ्या या व्यक्तीचं नाव शिहशाद आहे. तो पोन्नयमपालममध्ये राहणारा आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kerala, Viral, Viral videos