नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : लग्न हे एक पवित्र बंधन असल्याचं मानलं जातं. मात्र लग्नाविषयीच्या अनेक निरनिराळ्या घटना समोर येत असतात. यामध्ये अनेक घटना ऐकून तर धक्काच बसला आहे. अशातच एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर चक्क सहाव्या वेळा संसार थाटला आणि आता सातव्या लग्नाच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ पहायला मिळाली.
एका व्यक्तीचे सहा लग्न झाले असून तो सातव्या लग्नाच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी त्याचा डाव मोडत त्याला अटक केलं आहे. ही बातमी झारखंडमधील रांची येथून समोर आली आहे. या व्यक्तीने आपली ओळख धर्म लपवत आत्तापर्यंत तब्बल सहा लग्न केले. आणि आता सातवे लग्न करण्याच्या तयारीत होता. पोलिसांना या याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
हेही वाचा - ... अन् विना चालकच दुचाकी झाली सुरु, CCTV VIDEO मुळे भीतीचं वातावरण
सध्या अटकेत असलेल्या या व्यक्तीचं नान अस्लम असल्याचं समोर आलं आहे. आरोपी 50 वर्षाचा असून तो मुळ धनबादमधील भूलीचा रहवासी आहे. तो पोलीस अधिकारी असल्याचं सांगत मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा. सातव्यांदा अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात असताना पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, अशी अनेक फसवणूकीची प्रकरणे समोर येत असतात. अनेजण अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढत लग्नाची आमिष दाखवतात. यापूर्वीही अशी अनेक प्रकणे समोर आली आहेत ज्यामध्ये लग्नाचं आमिष दाखवून, आपली खरी ओळख लपवून फसवणूक केली आहे. त्यामुळे सावधानचा बाळगणं खूप गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Police, Top trending, Viral