Guinness Book Record: शरीरभर टॅटू आणि 453 वेळा पिअर्सिंग; या अवलिचा ‘अवतार’ एकदा बघाच

Guinness Book Record: शरीरभर टॅटू आणि 453 वेळा पिअर्सिंग; या अवलिचा ‘अवतार’ एकदा बघाच

जर्मनीच्या रॉल्फ बुकोज यांनी आपल्या शरीरात तब्बल 516 वेळा बदल (Body Modification) केले आहेत. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness Book Record मध्येही झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर: जगात वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसं असतात. अनेकांना काहीतरी वेगळं करायची इच्छा असते. आणि ते तसं करुनही दाखवतात. असाच एक अतरंगी माणूस जर्मनीमध्ये राहतो. या माणसाच्या नावावर सर्वात जास्त वेळा शरीरात बदल (Body Modification)चा विक्रम आहे. त्यांच्या विक्रमाची नोंद  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book Record)करण्यात आली आहे. शरीरावर टॅटू काढणं, पिअर्सिंग करणं अशाप्रकारे शरीरावर जे बदल केले जातात त्याला बॉडी मॉडिफिकेशन म्हटलं जातं.

जर्मनीच्या रॉल्फ बुकोज या व्यक्तीने 1 नाही 2 नाही तर तब्बल 516 वेळा बॉडी मॉडिफिकेशन केलं आहे. एवढं करुनही ते थांबणार नाहीत. "अजूनही मला माझ्या शरीरात काहीतरी मॉडिफिकेशन करायचं आहे." असं त्यांचं म्हणणं आहे. रॉस्फ बुकेज एका इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात काम करतात. 40व्या वर्षापासून त्यांना बॉडी मॉडिफिकेशनचा छंद लागला. आता त्यांनी वयाची साठी पार केली आहे. पण ते सतत काही ना काही वेगळ्या प्रकारचं बॉडी मॉडिफिकेशन करुन घेत असतात.

रॉल्फ यांनी आत्तापर्यंत आपल्या शरीरावर अनेक टॅटू काढून घेतले आहेत, त्यांच्या ओठांना भुवयांना पिअर्सिंग केलं आहे. गंमत म्हणजे त्यांनी त्यांच्या कपाळावर 2 शिंगदेखील बववून घेतली आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 453 वेळा पिअर्सिंग करुन घेतलं आहे. तर त्यांच्या 90% शरीरावर टॅटूही काढून घेतले आहेत. त्यांचा चेहरा सामान्य माणसांपेक्षा अतिशय वेगळा दिसतो. त्यांच्या या अतरंगी आवडीमुळे त्यांना एकदा त्रासही सहन करावा लागला होता. रॉल्फ एकदा दुबई विमानतळावर गेले होते. तेव्हा त्यांना तिथून बाहेर जाण्याची परवानगीच दिली जात नव्हती. पण आज याच आवडीमुळे त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आलं आहे. याचा त्यांना अभिमान आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 25, 2020, 4:12 PM IST

ताज्या बातम्या