पाण्यासारखी वाहून गेली 50 हजार लीटर रेड वाइन, VIRAL VIDEO पाहून वाइन प्रेमींना कोसळेल रडू

पाण्यासारखी वाहून गेली 50 हजार लीटर रेड वाइन, VIRAL VIDEO पाहून वाइन प्रेमींना कोसळेल रडू

रेड वाइनची एक बॉटल हजारो रुपये किंमतीची असते, मात्र एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र रेड वाइन प्रेमींना त्रास होईल.

  • Share this:

माद्रिद, 26 सप्टेंबर : वाइन प्रेमींना रेड वाइनचे महत्त्व चांगले माहित आहे. मात्र वाइनमध्ये रेड वाइन सर्वात जास्त महाग मानली जाते. रेड वाइनची एक बॉटल हजारो रुपये किंमतीची असते, मात्र एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र रेड वाइन प्रेमींना त्रास होईल. स्पेनमधील वाइनरी टँकमधून हजारो लिटर रेड वाइन पाण्यासारखी वाहीन जाताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ Radio Albacete नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला होता. आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, रेड वाइनने भरलेला एक मोठा कंटेनर फूटला असून त्यातून 50 हजार लिटर रेड वाइन वाहताना दिसत आहे. सुमारे 40 हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे तर 34 हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.

वाचा-...आणि चक्क एका उंदराला सरकारनं दिलं गोल्ड मेडल, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

वाचा-काचेचा तुकडा समजून दिला फेकून, तोच निघाला 9 कॅरेटचा हिरा! किंमत वाचून व्हाल शॉक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 49 सेकंदाच्या या व्हिडीओचा शेवट पाहून असे वाटले की जणू रेड वाइनचा पूर आला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 26, 2020, 10:39 PM IST

ताज्या बातम्या