मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अंगावर कोसळली 5 मजली इमारत; अनेक तासांनी चिमुकलीला त्या अवस्थेत पाहून सगळेच हैराण

अंगावर कोसळली 5 मजली इमारत; अनेक तासांनी चिमुकलीला त्या अवस्थेत पाहून सगळेच हैराण

मुलीला 5 मजली इमारतीच्या मलब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. इतक्यात मोठ्या दुर्घटनेतही ही मुलगी वाचली

मुलीला 5 मजली इमारतीच्या मलब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. इतक्यात मोठ्या दुर्घटनेतही ही मुलगी वाचली

मुलीला 5 मजली इमारतीच्या मलब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. इतक्यात मोठ्या दुर्घटनेतही ही मुलगी वाचली

    नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका लहान मुलीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. या मुलीला 5 मजली इमारतीच्या मलब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. इतक्यात मोठ्या दुर्घटनेतही ही मुलगी वाचली, हा चमत्कार असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांना विश्वासच बसत नव्हता, की पाच मजली इमारत कोसळल्यानं (Building Collapsed) त्याच्या मलब्याखाली अडकलेल्या मुलीला अनेक तासांनंतर बाहेर काढण्यात आलं आणि ती सुखरूप आहे. या मुलीला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नवव्या मजल्यावरून उडी घेतली अन् BMW वर कोसळला युवक; अवस्था पाहून सगळेच हादरले ही घटना 8 ऑक्टोबरची आहे. जेव्हा जॉर्जियामध्ये गॅस स्फोट झाला. यात आसपासच्या अनेक इमारतींनाही याचा फटका बसला. यात एक पाच मजली इमारत तर पूर्णपणे कोसळली. या घटनेच्या वेळी इमारतीत अनेक लोक उपस्थित होते. हे सर्व लोक मलब्याखाली दबले गेले होते. यातलं कोणीही वाचू शकेल, अशी आशाही उरली नव्हती. जवळपास तीनशे लोकांची टीम या सर्वांचा शोध घेत होती. अनेक तासांनंतर मलब्याखाली एक लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. यानंतर व्यवस्थित शोधलं असता ही चिमुकली आढळली. अरे हे काय! इवल्याशा पोपटाला घाबरून मांजराने ठोकली धूम, पाहा मजेशीर VIDEO या मुलीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर लोक भावुक झाले. कोणालाच विश्वास बसत नव्हता की ही चिमुकली जिवंत आहे. आता ती सुखरूप आढळल्यानं इतर लोकही जिवंत सापडतील अशी आशा वाढली आहे. यानंतर रेस्क्यू ऑपरेशन आणखी जलद करण्यात आलं. या मुलीचं वय 6 वर्ष आहे. ती इमारतीच्या खाली पार्क कारमध्ये आढळली. घटनेच्या वेळी ती पार्किंगमधील कारमध्ये असावी, असा अंदाज लावला जात आहे. याच कारणामुळे संपूर्ण इमारत तिच्यावर कोसळली. मात्र, तिचं नशीब चांगलं असल्यानं यात ती बचावली. मात्र, या मुलीचे कुटुंबीय जिवंत आहेत का, हे अद्याप समोर आलेलं नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral news

    पुढील बातम्या