Home /News /viral /

काय सांगता! श्वानाला मिळाली पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी; खास स्वरुपात मिळतो पगार

काय सांगता! श्वानाला मिळाली पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी; खास स्वरुपात मिळतो पगार

बर्नीने लवकरच हॉटेलच्या कर्मचार्‍यांशी मैत्री केली आणि ललित अशोक बंगळुरूचा आवडता कर्मचारी बनला. तो लॉबी मीटिंगला जातो, बेली मसाजची मागणी करतो आणि अगदी प्रेमळपणे वागतो.

  बंगळुरू 28 मे : जगात अनेकदा वाईट घटना घडताना पाहायला मिळत असल्या, तरी अनेक ठिकाणी चांगलेपणाही जिवंत आहे. जग कटुता आणि द्वेषाच्या कथांनी वेढलेलं असेल तर करुणा आणि प्रेमाच्या कथाही आहेत आणि बर्नीचं जीवन देखील अशीच एक कथा आहे. बर्नी हा एक कुत्रा आहे, ज्याला त्याच्या मालकाने सोडून दिलं होतं. यानंतर कुठे जायचं हेही बर्नीला माहिती नव्हतं, तेव्हा बंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलने (5 star hotel) त्याच्यासाठी आपले दरवाजे उघडले. इतकंच नाही तर त्यांनी त्याला रोजगारही दिला (Dog Working in 5 Star Hotel). विरोधाभास! मैदानात कुत्र्याला फिरवणारा अधिकारी, दुसरीकडे महिला IAS चिखलातून अनवाणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जेव्हा बर्नी द ललित अशोक बंगळुरूला आला तेव्हा तो खूप त्रस्त होता, घाबरला होता आणि एकाकी होता. पण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला फक्त मनापासून स्वीकारलंच नाही तर त्याला नोकरीही दिली. त्यांनी बर्नीला एक ओळखपत्र देखील दिलं आणि "Chief Happiness Officer" या पदासह त्याचं हॉटेलमध्ये स्वागत केलं. बर्नीने लवकरच हॉटेलच्या कर्मचार्‍यांशी मैत्री केली आणि ललित अशोक बंगळुरूचा आवडता कर्मचारी बनला. तो लॉबी मीटिंगला जातो, बेली मसाजची मागणी करतो आणि अगदी प्रेमळपणे वागतो.
  हॉटेलचे जनरल मॅनेजर म्हणतात की बर्नी हॉटेलमध्ये असणे हा एक अद्भुत अनुभव आहे. तो आमच्या पाहुण्यांना आणि कर्मचार्‍यांना हसवतो आणि प्रत्येकाला तो अगदी जवळचा वाटतो. पाहुणे त्यांच्या हॉटेलच्या मुक्कामादरम्यान बर्नीसोबत फिरणं, जेवण करणं आणि हँग आउट करणं ही सुविधा निवडू शकतात. बर्नी नेहमी सर्वांना आलिंगन देण्यासाठी तयार असतो आणि हॉटेलमध्ये पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो. आग लागताच धावू लागले पेट्रोल पंपाजवळील लोक; धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव, VIDEO विशेष बाब म्हणजे बर्नीला नेहमीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार दिला जातो पण पगाराच्या रूपात सर्व त्याला मिठी मारतात आणि त्याला भरपूर प्रेम देतात. बर्नी वेळेवर पोहोचतो, त्याचं कर्मचारी आयडी त्याच्या गळ्यात असतं. तो मिटिंगसाठी उपस्थित राहतो, त्याच्या वूफ आणि पूफसह आपली संमती किंवा असहमत व्यक्त करतो तसंच व्यस्त आणि त्रासलेल्या कर्मचाऱ्यांना सांत्वन देण्यासाठी शेपूट हलवतो. तो मोकळेपणाने सर्वांना आपल्याला मिठी मारण्याची परवानगी देतो. हॉटेल कर्मचार्‍यांसाठी तो एक खरा तणाव दूर करणारा स्ट्रेस बस्टर आहे. .
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Dog, Viral news

  पुढील बातम्या