मराठी बातम्या /बातम्या /Viral /डोकं असावं तर असं! पत्ता विचारण्यासाठी 5 रुपये आणि पत्त्यावर पोहोचवण्यासाठी 10 रुपये, व्हायरल Photo ने वेधलं लक्ष

डोकं असावं तर असं! पत्ता विचारण्यासाठी 5 रुपये आणि पत्त्यावर पोहोचवण्यासाठी 10 रुपये, व्हायरल Photo ने वेधलं लक्ष

व्हायरल

व्हायरल

आपण कोणत्या नवीन ठिकाणी गेल्यावर थोडावेळ कन्फ्युज होतो. नंतर कोणाला तरी रस्ता विचारत विचारत योग्य त्या ठिकाणी पोहोचतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 19 मार्च : आपण कोणत्या नवीन ठिकाणी गेल्यावर थोडावेळ कन्फ्युज होतो. नंतर कोणाला तरी रस्ता विचारत विचारत योग्य त्या ठिकाणी पोहोचतो. भारतात तर हे कायमच घडताना दिसतं. मात्र कोणी पत्ता विचारण्याचाही पैशांसाठी फायदा करुन घेईल याचा कधी विचार केलाय का? नसेल तर ही घटना वाचा.

पत्ता सांगणे ही मोठी गोष्ट नाही. ही समाजसेवा आहे. प्रत्येकाने ते करावे. पण पत्ता सांगण्याचे कामही व्यवसाय झाले तर? थोडं विचित्र वाटत असेल, पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या चित्राने हे सिद्ध केलं आहे की, आवड असेल तर कुठूनही उत्पन्नाचा स्रोत शोधता येतो. हा व्हायरल फोटो पाहा. "पत्ता विचारण्यासाठी 5 रुपये आणि पत्त्यावर पोहोचवण्यासाठी 10 रुपये" असे लिहिले आहे. म्हणजे लोक असाही विचार करु शकतात आणि कसाही पैसा कमावण्याचा मार्ग काढू शकतात.

सध्या हा व्हायरल होत असलेला फोटो @priyapalnii नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टवर भरभरुन कमेंट येत असून लाईक्सचाही वर्षाव होत आहे. अगदी काही वेळात ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

हे पहिले चित्र नाही ज्यावर वापरकर्ते हसले आहेत. असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे पाहून मन प्रसन्न होते. तसे, हा पत्ता देणारा व्यवसाय देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू करता येईल, कारण भारतासारख्या देशात पत्ता विचारल्याशिवाय कोणाचेही काम होऊ शकत नाही. आजकाल लोक हे काम फुकटात करत असले तरी, भविष्यात वेगळा व्यवसायही सुरू केला जाऊ शकतो.

First published:

Tags: Social media, Viral, Viral photo