Home /News /viral /

अडीच-तीन नव्हे, जन्मलं तब्बल 5 किलोचं बाळ, तेही नॉर्मल डिलिव्हरी; डॉक्टर म्हणाले...

अडीच-तीन नव्हे, जन्मलं तब्बल 5 किलोचं बाळ, तेही नॉर्मल डिलिव्हरी; डॉक्टर म्हणाले...

बीडीके रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. व्हीडी बाजिया यांनी सांगितले की, बीडीके रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता युनिटमध्ये एवढ्या वजनाचे हे पहिलेच बाळ आहे. 10,000 मुलांमध्ये असे एकच प्रकरण समोर येते. हे काही सिंड्रोममुळे देखील असू शकते.

    जयपूर, 15 जानेवारी : नवजात शिशूचं वजन सामान्यत: अडीच ते साडेतीन किलो दरम्यान असतं. मात्र राजस्थानच्या झुंझुनूंमध्ये एक दुर्मिळ घटना घडली आहे. झुंझुनूं येथील बीडीके रुग्णालयात एका महिलेने एका बाळाला जन्म दिला, या बाळाचं वजन तब्बल 5 किलो भरलं आहे. सध्या बाळ आणि बाळाची आई दोघांचीही प्रकृत्ती उत्तम आहे. झुंझुनूच्या वॉर्ड 18 मध्ये राहणाऱ्या रुखसाना बानोने मुलाला जन्म दिला. रुखसाना बानोची ही चौथी प्रसूती होती. याआधीही त्यांना तीन मुले आहेत. या प्रसूतीमधील विशेष बाब म्हणजे बाळाचा वजन जास्त असलं तरी बीडीके रुग्णालयातील डॉक्टरांनी नॉर्मल प्रसूती केली आहे. बीडीके रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. जितेंद्र भांभू यांनी सांगितले की, नवजात बालकांचे वजन साधारणपणे 2.5 ते 3.5 किलो असते. 30 टक्के मुलांचे वजन 2.5 किलोपेक्षा कमी असते. हे निश्चित आहे की 90 टक्के मुलांचे वजन 3.5 किलोग्रॅमपेक्षा कमी आहे. विश्वास बसणार नाही पण हे असे फोटो विकून हा तरुण झाला मालामाल; 5 दिवसांतच कमावले कोट्यवधी रुपये झुंझुनूच्या बीडीके रुग्णालयात पहिल्यांदाच जन्मले 5 किलो वजनाचे बाळ बीडीके रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. व्हीडी बाजिया यांनी सांगितले की, बीडीके रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता युनिटमध्ये एवढ्या वजनाचे हे पहिलेच बाळ आहे. 10,000 मुलांमध्ये असे एकच प्रकरण समोर येते. हे काही सिंड्रोममुळे देखील असू शकते. बीडीके रुग्णालयाच्या महिला रुग्णालय युनिटच्या प्रभारी डॉ. पुष्पा रावत यांनी सांगितले की, बाळाची आई आता सामान्य आहे. आईला कोणताही आजार नाही. जर मुलाचे वजन जास्त असेल तर बहुतेक प्रकरणांमध्ये आईला शुगर असते. रुखसानाला ना शुगर आहे ना थायरॉईड. इटलीच्या प्रिन्सला गर्लफ्रेंडनं म्हटलं कंजूष, कोर्टात पोहोचलं प्रकरण अशा मुलांची त्यांच्या कुटुंबीयांनी अधिक काळजी घेतली पाहिजे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ.जितेंद्र भांभू यांनी सांगितले. सहसा, शुगर संबंधित समस्यांमुळे आईचे वजन जास्त असण्याची शक्यता असते. रुखसानाला कोणत्याही आजाराने ग्रासलेले नाही. सुमारे तीन ते चार महिन्यांच्या बाळाचे वजन सुमारे 5.30 किलो असते. नॉर्मल डिलिव्हरी करणंही एक आव्हान होतं एमसीएचच्या प्रभारी आणि ज्येष्ठ प्रसूतीतज्ज्ञ डॉ. पुष्पा रावत यांनी सांगितले की, बाळाचे वजन खूप जास्त होते. टेस्टमध्ये ते समोर आले होते. त्यात नॉर्मल डिलिव्हरी करणेही सोपे नव्हते. टीम सदस्य डॉ.सुजाता महलवत, डॉ. मधू तन्वर, डॉ. सुमन भलोठिया आदींनी पार्टोग्राफमधून सतत निरीक्षण केले. केव्हाही सिझेरियन ऑपरेशन करावे लागेल, असेही ठरले होते. डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या टीमने असे काम केले की जोपर्यंत सामान्य प्रसूती शक्य आहे, तोपर्यंत सामान्य प्रसूती होईल आणि प्रसूत सामान्यच झाली.
    First published:

    Tags: Health, Small baby

    पुढील बातम्या