मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! फक्त विचारानेच Fat To Fit केलं, 110 किलोची महिला 59 किलोची झाली; सांगितली Weight Loss Trick

OMG! फक्त विचारानेच Fat To Fit केलं, 110 किलोची महिला 59 किलोची झाली; सांगितली Weight Loss Trick

इतके प्रयत्न करूनही वजन घटलं नाही पण महिलेने असा विचार केला की तिचं वजन कमी झालं आणि पुन्हा बिलकुल वाढलं नाही.

इतके प्रयत्न करूनही वजन घटलं नाही पण महिलेने असा विचार केला की तिचं वजन कमी झालं आणि पुन्हा बिलकुल वाढलं नाही.

इतके प्रयत्न करूनही वजन घटलं नाही पण महिलेने असा विचार केला की तिचं वजन कमी झालं आणि पुन्हा बिलकुल वाढलं नाही.

लंडन, 26 एप्रिल :  असे बरेच लोक आहेत जे लठ्ठपणामुळे वैतागले आहेत. वजन कमी करण्यासाठी काय काय नाही करत. डाएट म्हणू नका, एक्सरसाइझ म्हणू नका किंवा विविध घरगुती किंवा वैद्यकीय उपचार म्हणू नका... शक्य ते सर्व केलं जातं. पण इतकं करूनही वजन काही कमी होत नाही. असंच घडलं ते यूकेतील एका महिलेसोबत. शेवटी तिने फक्त आपल्या विचारानेच आपलं वजन घटवलं आहे (41 year old England woman lost weight by thinking) . तुम्हाला आश्चर्य वाटेल पण 110 किलोची ही महिला आता 59 किलोची झाली आहे (110 kg woman weight loss journey).

चेशायरच्या हेनबरीमध्ये राहणारी 41 वर्षांची रेशेल विलियम्स (Rachel Williams) एक लाइफ कोच आहे. तिने विचार करून वजन घटवलं आहे. आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. रेशलने आपली वेट लॉस जर्नी इतरांसोबतही शेअर करते. जेणेकरून इतरांनाही अशा पद्धतीने वजन कमी करण्याचं प्रोत्साहन मिळेल.

रेशेलने सांगितलं की, वयाच्या आठव्या वर्षापासूनच ती लठ्ठ होती. लपूनछपून गोड पदार्थ आणि फास्ट फूड खायची. शाळा-कॉलेजमध्ये तिचं वजन काही प्रमाणात कमी झालं, पण म्हणावं तितकं नाही. लग्नानंतर तर तिचं वजन वाढतच गेलं. तिला एक्स-एल साइझही येत नव्हती. वजनामुळे तिला मुलांसोबत फोटोही काढायला आवडत नव्हता.

आपलं वजन आपल्या आणि मुलांच्या मध्ये येत असल्याचं लक्षात येताच तिने वजन घटवण्यासाठी प्रयत्न सुरू केलं. इथूनच तिची वेट लॉस जर्नी सुरू झाली. सुरुवाचीली ती जिममध्ये जाऊन भरपूर एक्सरसाइझ करून वजन घटवण्याचं प्लॅन करत होती, पण तिला ते शक्य झालं नाही. तिच्या वजन फार फरक पडला नाही.

हे वाचा - 'फोन, लहान मुलं बॅन आणि...', पाहुण्यांसाठी नवरीच्या विचित्र अटी; वाचून म्हणाल, 'असं लग्न नको गं बाई'

इतक्या प्रयत्नानंतर वजन घटलं नाही त्यामुळे तिने हार मानली ती निराश झाली. तिने आपला विचार कऱण्याचा दृष्टिकोनच बदलला. ती नेहमी कॅलरी मोजून खायची. काय खाऊ शकत नाही, याचा विचार करायची. पण नंतर तिने काय खाऊ शकते याचा विचार केला आणि त्यापैकी चांगल्यात चांगले पदार्थ ती खाऊ लागली. तिने गोड खाणं सोडलं, फास्ट फूडला तर तिने आपल्या आयुष्यातूनच हटवलं. तेव्हा मात्र तिचं वजन कमी होत असल्याचं तिला जाणवलं. तेव्हापासून आपण लठ्ठ आहोत हा विचार करणंही तिने बंद केलं. आपण सडपातळ आहोत आणि आपल्याला निरोगी राहायचं आहे, असा विचार करणं तिने सुरू केलं. तीन दिवस जीम करू लागली आणि हेल्दी खाणं खाऊ लागली.

जून 2020 पर्यंत तिने 110 किलो वजन कमी करून 65 किलो केलं. त्यानंतर डिसेंबर 2020 पर्यंत तिचं वजन 59 किलो झालं. आता जशी तिची जीवनशैली आहे, त्यामुळे तिचं वजन बिलकुल वाढलं नाही.

हे वाचा - कोल्हापूरहून पुण्यात धडधडत्या हृदयाचा प्रवास! तब्बल 270 किमी अंतर अवघ्या 150 मिनिटांत पार केलं

तिने इतर लोकांनीही काही टिप्स दिल्या आहेत. रेशेलने लो फॅट खाणं पूर्णपणे सोडलं आहे कारण त्यात केमिकल असतात. जर तुम्ही फॅटशीसंबंधित पदार्थ खात असाल तर तेसुद्धा जाते आणि चांगल्या क्वालिटीचे खा, असा सल्ला तिने दिला आहे.

First published:

Tags: Lifestyle, Viral, Weight, Weight loss, Weight loss tips