Home /News /viral /

फोटो 1 आणि जाहिराती 40! पाहा तुम्हाला तरी ओळखता येतायत का?

फोटो 1 आणि जाहिराती 40! पाहा तुम्हाला तरी ओळखता येतायत का?

जर तुम्ही 90च्या दशकातले असाल तर तुम्हाला नक्कीच या जाहिराती ओळखता येतील. बघा जमतंय का!

    जेव्हा तुम्हाला खुप कंटाळा येतो, तेव्हा तुमचे लक्ष विचलित होते. अशा वेळी डोक्याला चालना देण्यासाठी काही ना काही तर शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोनं सध्या सगळ्यांना हैराण केले आहे. कारण या एका फोटोमध्ये आहेत तब्बल 40 जाहिराती. वैभव विशाल नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटरवर एका पेंटिंगचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये 40 भारतीय जाहिराती लपलेल्या आहेत. त्यांनी लिहिले की, 'या चित्रात 40 भारतीय जाहिराती दडलेल्या आहेत, ज्यांना आठवणी आवडतात त्यांच्यासाठी हा एक छोटा आणि आश्चर्यकारक प्रवास असेल. मजा करा, जेव्हा तुम्हाला सर्व जाहिराती मिळतील तेव्हा बक्षीस म्हणून स्वत: ला जलेबी द्या”. वाचा-मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा वाचा-काय तो माज! ट्रॅफिक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून 2 किमी पळवलं, VIDEO VIRAL या पेंटिगचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतरच व्हायरल झाला आहे. यावर लोकांना विविध मजेशीर कमेंटही केल्या आहेत. काही लोकांना 10 तर काहींनी 20 जाहिराती ओळखल्या आहेत. वाचा-सच्चा भक्त! श्वानाने परफेक्ट सुरात गायले संत तुकोबांचे अभंग VIDEO VIRAL एका युझरने लोकांसाठी चक्क 40च्या 40 जाहिराती मार्ककरून शेअर केल्या आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या