Home /News /viral /

Shocking! स्वस्त साबण पडला महागात; अचानक पेट घेतल्यानं 4 वर्षीय मुलाची झाली भयंकर अवस्था

Shocking! स्वस्त साबण पडला महागात; अचानक पेट घेतल्यानं 4 वर्षीय मुलाची झाली भयंकर अवस्था

महिलेनं आपल्या मुलांना अंघोळीसाठी मार्केटमधून अतिशय स्वस्तातील साबण आणला. या साबणामुळे अशी दुर्घटना (Cheap Soap Accident) घडली की बाळाला थेट रुग्णालयातील बर्निंग वार्डमध्ये (Burning Ward) दाखल करावं लागलं.

    नवी दिल्ली 18 सप्टेंबर : लहान मुलांची त्वचा अतिशय नाजूक (Sensitive Skin) असते. त्यामुळे पालक आपल्या मुलांसाठी बहुतेकदा चांगले प्रोडक्टच वापरताना दिसतात. मात्र, अनेकदा पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात पालक खराब क्वालिटीचे प्रोडक्ट घेऊन येतात. अशावेळी ते या गोष्टीचा विचार करत नाहीत, की पुढे यामुळे आपलं अजूनही नुकसान होऊ शकतं. इंग्लंडच्या (England) लिव्हरपूलमध्ये (Liverpool) राहणाऱ्या महिलेनं आपल्या मुलांना अंघोळीसाठी मार्केटमधून अतिशय स्वस्तातील साबण आणला. या साबणामुळे अशी दुर्घटना (Cheap Soap Accident) घडली की बाळाला थेट रुग्णालयातील बर्निंग वार्डमध्ये (Burning Ward) दाखल करावं लागलं. ऑनलाईन क्लासदरम्यान तरुणीचं विचित्र कृत्य; फोटो पाहून नेटकरी हैराण ही घटना ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. स्थानिक माध्यम लिव्हरपूल इकोनं दिलेल्या वृत्तानुसार, 4 वर्षाच्या ऑस्कर बेडार्ड (Oscar Bedard) याला रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल केलं गेलं. ऑस्करचं शरीर पूर्णपणे जळालं होतं. त्याच्या या अवस्थेला जबाबदार होता स्वस्तातील साबण. मीडियाला याबाबत माहिती देताना ऑस्करच्या वडिलांनी सांगितलं, की साबणाच्या फेसाला आग लागल्यानं ही घटना घडली. ऑस्करच्या वडिलांनी सांगितलं, की ते आपल्या मुलाला बाथरूममध्ये अंघोळ घालत होते. त्यावेळी बाथरूममध्ये काही मेणबत्त्या लावलेल्या होत्या. ऑस्कर अंघोळ करत असतानाच अचानक त्याच्या त्याच्या शऱीरावरील साबणाचा फेस मेणबत्तीच्या संपर्कात आला. यामुळे याला आग लागली. पाहता पाहता त्यांचा चार वर्षाचा मुलगा एखाद्या आगीच्या गोळ्याप्रमाणे दिसू लागला. डोक्यापासून पायापर्यंत हा मुलगा जखमी झाला होता. हद्दच झाली! विमानातच कपलचे अश्लील चाळे; प्रवासी शूट करत राहिले व्हिडिओ आपल्या मुलाला या अवस्थेत पाहून पालकही घाबरले. त्यांनी लगेचच गाडी काढली आणि ऑस्करला रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात घेऊन जात असताना ऑस्करला वेदना सहन होत नव्हत्या. रुग्णालयात बर्न सेक्शनमध्ये त्याच्यावर उपचार केले गेले. घटनेनंतर जॉनाथननं साबणाच्या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. साबण कंपनीनं मात्र अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Fire, Viral news

    पुढील बातम्या