मराठी बातम्या /बातम्या /Viral /वॉशिंग मशीन उघडताच थरकाप; चार साप पाहून महिलेची उडाली धांदल, पाहा VIDEO

वॉशिंग मशीन उघडताच थरकाप; चार साप पाहून महिलेची उडाली धांदल, पाहा VIDEO

एका महिलेला कपडे साफ करण्यासाठी वॉशिंग मशीन उघडताच यात साप असल्याचं (Snakes in Washing Machine) आढळलं. वॉशिंग मशीनमध्ये तब्बल चार साप असल्याचं समजताच कुटुंबीयांची धांदल उडाली

एका महिलेला कपडे साफ करण्यासाठी वॉशिंग मशीन उघडताच यात साप असल्याचं (Snakes in Washing Machine) आढळलं. वॉशिंग मशीनमध्ये तब्बल चार साप असल्याचं समजताच कुटुंबीयांची धांदल उडाली

एका महिलेला कपडे साफ करण्यासाठी वॉशिंग मशीन उघडताच यात साप असल्याचं (Snakes in Washing Machine) आढळलं. वॉशिंग मशीनमध्ये तब्बल चार साप असल्याचं समजताच कुटुंबीयांची धांदल उडाली

अहमदाबाद 29 जून: एका महिलेला कपडे साफ करण्यासाठी वॉशिंग मशीन उघडताच यात साप असल्याचं (Snakes in Washing Machine) आढळलं. वॉशिंग मशीनमध्ये तब्बल चार साप असल्याचं समजताच कुटुंबीयांची धांदल उडाली. यानंतर सर्पमित्रांना बोलावण्यात आलं. सर्पमित्रांनी एक-एक करून चारही सापांना मशीनमधून बाहेर काढलं (Rescue Operation) . यानंतर या सर्व सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं. ही बातमी आगीप्रमाणं आजूबाजूच्या परिसरात पसरली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही घटना गुजरातच्या (Gujarat) पालनपूर येथील एका सोसायटीमधील आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Snake Video Viral) झाला आहे.

भरधाव कारनं फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलं; थरारक घटनेचा LIVE VIDEO

पालनपूर शहरातील राधे रेसिडन्सीच्या सोसायटीत राहाणारी एक महिला कपडे धुण्यासाठी घरातील वॉशिंग मशीन उघडण्यासाठी गेली. तेव्हा आतमध्ये साप असल्याचं तिला आढळलं. तात्काळ कुटुंबीयांनी सर्पमित्रांना फोन केला. सर्पमित्रांनी सर्वात आधी ही वॉशिंग मशीन घराबाहेर काढली. जेणेकरून रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान साप बाहेर पडले तरीही कोणालाही धोका नसेल. तब्बल दोन तासाच्या मेहनतीनंतर अखेर या तरुणांनी चारही सापांना सुखरुप बाहेर काढलं. यात दोन मोठे तर दोन लहान साप होते. या सर्व सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं.

VIDEO : अरे हे काय! तरुणानं नवरीसोबत केलं असं काही की पाहून नवरदेवही चक्रावला

एकाचवेळी वॉशिंग मशीमध्ये चार साप आढळल्याचं ऐकताच लोकांनी याठिकाणी गर्दी केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या फ्लोरिडामध्येही अशीच एक घटना घडली होती. यात महिलेनं कपडे धुवून ते सुकवण्यासाठी मशीनमध्ये ठेवले, मात्र वारंवार प्रयत्न करूनही मशीन सुरू झाली नाही. नंतर यात साप असल्याचं आढळून आलं.

First published:
top videos

    Tags: Gujrat, India, Rescue operation, Shocking video viral, Snake video, Viral