Home /News /viral /

अशक्य! 15 सेकंदात टायगर झाल्या 4 मुली, वाचून आश्चर्य वाटत असेल तर पाहा VIDEO

अशक्य! 15 सेकंदात टायगर झाल्या 4 मुली, वाचून आश्चर्य वाटत असेल तर पाहा VIDEO

तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा VIDEO पाहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.

    नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : वाघ म्हणजे असा प्राणी ज्याला पाहूनच भीती वाटेल. पण तुम्हाला कोणी सांगितलं की अवघ्या 15 सेकंदात तुम्हीही वाघ होऊ शकता तर? विश्वास बसत नसेल ना. मात्र चार अवलिया मुलींनी हे करून दाखवलं आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मी़डियावर व्हायरल होत आहे. 15 सेकंदात या मुलींनी अगदी हुबेहुब वाघासारखा बॉडी पेंट केलं आहे. हा व्हिडीओ पाहून दोन सेकंद तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. रॅक्स चॅपमन या ट्विटर युजरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही आहे. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाचा-भारतात पहिल्यांदाच या श्वानाने केलं पॅराग्लाइडिंग; हा VIRAL VIDEO पाहाच आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या तरुणी कोणत्या देशाच्या आहेत, ही माहिती नसली तरी सोशल मीडियावर या तरुणींचं कौतुक केलं जात आहे. वाचा-धक्कादायक! ऑन ड्युटी शिपायानं बार गर्लवर पैसे उडवत स्टेवर लगावले ठुमके वाचा-माझ्या नवऱ्याची बायको! पत्नीनेच लावून दिलं आपल्या पतीचं गर्लफ्रेंडसोबत लग्न या व्हिडीओवर लोकांनी एकापेक्षा एक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही लोकांनी या मुलींनी अंगावर पेंटिंग केलं आहे यावर विश्वासच बसत नाही आहे. तर काहींनी वाघही यांना पाहून आपल्यातलाच मानेल अशा मजेशीर कमेंट केल्या आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या