मुंबई, 2 फेब्रुवारी : तुम्ही घरात अंघोळीच्या साबनाचा हमखास वापर करत असाल. मात्र याच अंघोळीच्या साबनाचा उपयोग एखाद्या धक्कादायक गोष्टीसाठी होईल याचा कोणी विचारही करु शकत नाही. मात्र प्रत्यक्षात असा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराविषयी जाणून तुम्हीदेखील चक्रावून जाल.
एखाद्या साबनाची किंमत 33 कोटी रुपये असू शकते यावर तुमचा विश्वास बसेल का? ती कशी काय याविषयी पाहुया. डीआरआय मुंबईने विमानतळावर मोठी कारवाई करत याविषयीचं सत्य उघड केलं आहे. मुंबईत महसूल गुप्तचर संचालयाने (डीआरआय) ने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला पकडले. जो इथोपियन एअरलाइन्स ET-640 ने मुंबत पोहचला. तपासाच अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली आणि तपासात एक धक्कादायक बाब समोर आली.
हेही वाचा - मद्यप्रेमींना ‘या’ देशांमध्ये राहण्यास नक्कीच आवडेल, कारणही आहे तेवढंच खास
डीआरआयने पकडलेल्या आरोपीकडून 16 साबणाचे बॉक्स जप्त करण्यात आले आहे. जे दिसायला अगदी सामान्य साबनासारखे होते. मात्र जेव्हा व्यवस्थित तपासणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. साध्या दिसणाऱ्या साबनामध्ये कोकेन लपवलेलं होतं. या साबणांमध्ये ३३६० ग्रॅम कोकेन लपवून ठेवल्याचे आढळून आले, ज्याचीबाजारातील किंमत 33.60 कोटी रुपये आहे.
दरम्यान, डीआरआयने आरोपीला एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. लोक कशातून तस्करी तस्करी करतील याचा काही नेम नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Drugs, Viral