Home /News /viral /

VIDEO : 3 वाघांच्या तावडीत सापडली मांजर; बचावासाठी शेवटपर्यंत लढली, पाहा पुढे काय झालं

VIDEO : 3 वाघांच्या तावडीत सापडली मांजर; बचावासाठी शेवटपर्यंत लढली, पाहा पुढे काय झालं

मांजर स्वतःच्या बचावासाठी जिवाच्या अकांताने प्रयत्न करते मात्र वाघ तिला सोडत नाही. इतक्यात दोन किपर तिथे येतात.

  नवी दिल्ली 24 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Animal Videos) होत असतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. अॅनिमल लव्हर्ससाठी तर हे व्हिडिओ अधिकच खास असतात. मात्र अनेकदा प्राण्यांचे असे व्हिडिओही व्हायरल होतात जे पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका मांजरीवर तीन वाघांनी हल्ला केल्याचं पाहायला मिळतं (Tigers Attacked on Cat) . इन्स्टाग्रामवर यूएईचे पंतप्रधान राशिद अल मत्कूम यांची मुलगी शेखी लतीफा अल मत्कूम (Sheikh Latifa Al Maktoum) यांनी चार व्हिडिओ शेअर केले आहेत. यात एका छोटीशी मांजर वाघांच्या जाळ्यात गेल्याचं पाहायला मिळतं. मांजर तिथे असल्याचं समजताच वाघ तिथे येतात. यात दोन पांढरे वाघ आहेत. यानंतर तिन्ही वाघ मांजरीवर हल्ला करतात आणि तिला आपल्या जबड्यात धरून ओढू लागतात . व्हिडिओ पाहताना असं वाटतं की आता मांजराचा जीव जाणार. मात्र ही छोटीशी मांजरही हार मानत नाही (Tigers Cat Fight Video).
  मांजर स्वतःच्या बचावासाठी जिवाच्या अकांताने प्रयत्न करते मात्र वाघ तिला सोडत नाही. मात्र इतक्यात दोन किपर तिथे येतात. यानंतर यातील एक वाघ मांजरीला आपल्या तोंडात धरून बसतो. किपर तिथे जाताच वाघ मांजरीला तिथेच सोडून पळतो. तिसऱ्या व्हिडिओमध्ये मांजर घाबरलेली दिसते आणि चौथ्या व्हिडिओमध्ये डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लतीफा यांनी लिहिलं, मांजर वाघांच्या तावडीत सापडली. मात्र तिनं शेवटपर्यंत लढा दिला. तिचा जीव वाचवण्यात आला आहे. बरी झाल्यावर तिची काळजी घेतली जाईल. लतीफा इन्स्टाग्रामवर अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात. तिच्याकडे अनेक जंगली प्राणीही आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Cat, Shocking video viral, Tiger attack

  पुढील बातम्या