मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: 3 हिंस्त्र सिंहांसोबत भिडली एकटी मगर; लढाईचा शेवट बघाच

VIDEO: 3 हिंस्त्र सिंहांसोबत भिडली एकटी मगर; लढाईचा शेवट बघाच

सिंहांचा कळप मगरीची शिकार करण्यासाठी येतो, मात्र त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याऐवजी मगर त्यांना बरोबरीची स्पर्धा देताना दिसते. एकदा तर हे सिंह मगरीला जवळपास आपल्या तावडीत घेतातच मात्र पुन्हा मगर त्यांच्या तावडीतून आपला बचाव करते

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 31 मे : असं म्हणतात की जंगलाचा एकच नियम असतो, जो ताकदवर असतो तो राज्य करतो आणि तो दुर्बल असतो त्याचं आयुष्य इथे खूपच कमी असतं. जंगलातील प्राण्यांना त्यांची भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांना मारावं लागतं आणि त्या हल्ल्यातून जे वाचतात, त्यांचं आयुष्य आणखी काही दिवसांसाठी वाढतं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंह आपली भूक भागवण्यासाठी मगरीवर हल्ला करताना दिसत आहेत (Lion Crocodile Fight Video). उंच इमारतीवरुन तरुणाने घेतली उडी, पुढे काय घडलं बघा; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO सहसा सिंहांना पाहून कोणताही प्राणी घाबरतो. जर ते आपली गँग घेऊन आले तर समोरचा प्राणी जिवंत राहील याची शक्यता जवळपास संपूनच जाते आणि सिंह या प्राण्याची शिकार करणार, ही शक्यता दाट असते. मात्र, समोरच्या प्राण्याची शक्ती आणि विश्वास भरपूर असेल तर तो सिंहालाही पळवून लावू शकतो. याचाच प्रत्यय देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram

A post shared by Lions Daily (@lionsdaily_)

सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि त्याच्या पराक्रमाचा सामना करणं सोपं नाही. हरणांसारख्या नाजूक प्राण्यांपासून ते रान म्हैस आणि पाण्यात असलेल्या मगरीपर्यंत बलाढ्या प्राण्यांची शिकार करण्यातही सिंह पटाईत असतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंहांचा कळप आणि मगरी यांच्यातील झुंज दिसत आहे. 3 सिंहांचा कळप मगरीची शिकार करण्यासाठी येतो, मात्र त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याऐवजी मगर त्यांना बरोबरीची स्पर्धा देताना दिसते. एकदा तर हे सिंह मगरीला जवळपास आपल्या तावडीत घेतातच मात्र पुन्हा मगर त्यांच्या तावडीतून आपला बचाव करते. माकडांचा वर्ग झाला सुरू, तरुणाने शिकवलं अ..आ; मजेशीर Viral Video हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर lionsdaily_नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 64 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या लढाईचा शेवट काहीही झाला असो, मात्र लोक यातील मगरीच्या आत्मविश्वासाचं कौतुक करत आहेत. तिने शेवटपर्यंत हार मानली नाही. याआधी एका जिराफाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. हे जिराफही सिंहांनी भरपूर प्रयत्न करूनही त्यांच्या तावडीत सापडलं नाही.
First published:

Tags: Crocodile, Shocking video viral

पुढील बातम्या