Home /News /viral /

#LavishDreamHome 'या' आलिशान बंगल्यावर मिळतेय अब्जावधी रुपयांचं Discount, किंमत ऐकून बसेल धक्का

#LavishDreamHome 'या' आलिशान बंगल्यावर मिळतेय अब्जावधी रुपयांचं Discount, किंमत ऐकून बसेल धक्का

दिल्ली-मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये (Cosmopolitan Cities) तर भाड्यानं मनासारखं घर घेणंदेखील सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपली आलिशान घराची (Luxurious Home) कल्पना ही फक्त एक स्वप्न बनूनचं राहते.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 20 एप्रिल: स्वत: च्या मालकीचं एखादं घर (Home) असावं, अशी अनेकांची इच्छा असते. आपलंही एखादं आलिशान घर असावं याबाबत प्रत्येकाच्या मनात काहीनाकाही कल्पना असतात. मात्र, सध्याच्या काळात जमिनीचे आणि घरांचे दर (House Prices) मोठ्या प्रमाणात वाढल्यानं घर खरेदी करण्यासाठी आयुष्यभराची कमाई पणाला लावावी लागते. दिल्ली-मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये (Cosmopolitan Cities) तर भाड्यानं मनासारखं घर घेणंदेखील सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपली आलिशान घराची (Luxurious Home) कल्पना ही फक्त एक स्वप्न बनूनचं राहते.ब्रिटनमध्ये सध्या असाच एक 'सपनों का महल' विक्रीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या आलिशान घराची किंमत ऐकून मात्र, भल्या-भल्यांचे डोळे पांढरे होण्याची शक्यता आहे. अँगलफिल्ड ग्रीनमधील 'बिशपगेट हाऊस' (Bishopsgate House) या घराची सरेमधील (Surrey) सर्वांत महागड्या घरांमध्ये गणना होते. हा आलिशान बंगला एवढा मोठा आहे की, तो एखाद्या भुलभुलैय्याप्रमाणं (Maze) भासतो. या घराच्या आवारात स्वतंत्र हेलिपॅड (Helipad), इनडोअर पूलसह (Indoor Pool) इतर अनेक लक्झुरियस गोष्टी आहेत. सध्या हे घर विक्रीसाठी उपलब्ध आहे. चार वर्षांपूर्वी या घराची किंमत सुमारे चार अब्ज 96 कोटी, 54 लाख, 46 हजार रुपये इतकी होती. हे घर आता मोठ्या डिस्काउंटसह (Discount) मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलं गेलं आहे. म्हणजेच आता हा आलिशान बंगला काही लोकांच्या बजेटमध्ये येऊ शकतो. 2016 मध्ये, एका हाय-प्रोफाइल घटस्फोट प्रकरणात या बंगल्याचं नाव समोर आलं होतं. आलिशान बंगल्यावर मिळत आहे तीन अब्ज रुपयांची सूट हा आलिशान बंगला अँगलफील्ड ग्रीनमधील विंडसर कॅसलपासून (Windsor Castle) चार मैलांच्या अंतरावर आहे. 2016 मध्ये एका हाय-प्रोफाइल घटस्फोट प्रकरणात हे घर प्रकाशझोतात आलं होतं. घराचे मालक शेख वालिद जुफाली (Walid Juffali) यांनी क्रिस्टिना एस्ट्राडा यांच्याशी सात अब्ज, 45 कोटी 63 लाख 42 हजारांची सेटलमेंट केली होती. ही त्यावेळी यूकेतील (UK) सर्वांत मोठी सेटलमेंट ठरली होती. कायदेशीर प्रक्रियेनंतर लगेचच जुफाली यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबानं आता हे घर विक्रीसाठी काढलं आहे, असं वृत्त सरे लाइव्हनं दिलं आहे. घराची लवकरातलवकर विक्री व्हावी यासाठी या अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेवर भरघोस सूट देऊन खरेदीदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2018 मध्येदेखील हे घर विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं. आता एक तृतीयांश सवलतीसह ते नव्यानं विक्रीसाठी उपलब्ध झालं आहे. अनेकांच्या स्वप्नातील घर या घराच्या परिसरात 33 हजार 264 चौरस फूट क्षेत्रफळाचं हेलिपॅड आहे. विंडसर कॅसलला भेट देताना राजघराण्यातील लोक वेळोवेळी या हेलिपॅडचा वापर करतात. म्हणूनही हे घर प्रसिद्ध आहे. अशा घराला स्वप्नांचा महाल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राजा महाराजांसारखं ऐषोआरामाचे जीवन जगण्याची आवड असणार्‍या लोकांपैकी एखादी व्यक्ती मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकते. अब्जावधी रुपायांचं हे आलिशान घर कोण खरेदी करणार, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Viral news

पुढील बातम्या