Home /News /viral /

अरे बापरे! चुकून दीड कोटी पगार पोहोचला खात्यात, मालामाल झालेल्या गड्यानं नोकरी सोडली अन्..

अरे बापरे! चुकून दीड कोटी पगार पोहोचला खात्यात, मालामाल झालेल्या गड्यानं नोकरी सोडली अन्..

गेल्या महिन्यात चिलीच्या एका कंपनीतील कर्मचाऱ्याच्या खात्यात चुकून 286 महिन्यांचा पगार जमा झाला.

    एकीकडे नोकरी (Job) मिळवण्यासाठी लोक मेहनत करत आहेत. तर दुसरीकडे नोकरदारही आपले काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. मात्र, कल्पना करा की एखाद्या व्यक्तीच्या खात्यात एका महिन्याच्या कामाच्या बदल्यात तब्बल 286 महिन्यांचा पगार (Salary) आला तर? विश्वास बसत नाहीए ना. तर हो. असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे अचानक एका व्यक्तीच्या खात्यात इतके पैसे आले की विश्वास बसत नाही. यानतंर असं काही घडलं ज्याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. नेमकं काय आहे प्रकरण - ही घटना चिली येथील आहे. फॉर्च्युन डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात चिलीच्या एका कंपनीतील कर्मचाऱ्याच्या खात्यात चुकून 286 महिन्यांचा पगार जमा झाला. जेव्हा त्या व्यक्तीने आपले खाते तपासले तेव्हा त्याचा एकदा विश्वासच बसला नाही. जेव्हा त्याने ते पाहिले तेव्हा त्याला असे आढळले की, प्रत्यक्षात त्याच्या पगारात इतके पैसे आले आहेत की ही रक्कम त्याच्या एका महिन्याच्या पगारापेक्षा 286 पट जास्त आहे. दुसरीकडे कंपनीला याबाबत माहिती मिळताच त्यांना आपली चूक लक्षात आली. कंपनीने या कर्मचाऱ्याशी संपर्क साधून त्याला कार्यालयात बोलावले. तसेच कर्मचाऱ्याला पैसे परत करण्यास सांगितले असता त्याने कंपनीला लवकरच पैसे परत करू असे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेच नाही. तो पैसे परत करण्यास तयार झाला. मात्र, कदाचित तो इतका लोभी झाला होता की त्याने गुपचूप निर्णय घेतला. त्याने आधी कंपनीतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यानंतर तो एका अशा जागी फरार झाला की, ज्याबाबत कुणालाच माहित झालं नाही. अहवालानुसार, कंपनीने त्यांना सुमारे दीड कोटी रुपये पगार म्हणून पाठवले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने रेकॉर्ड तपासल्यावर ही चूक उघडकीस आली. हेही वाचा - Shocking! किडनी स्टोनवर उपचारासाठी रुग्णालयात गेली तरुणी आणि अचानक जन्माला आलं बाळ सध्या कर्मचारी फरार झाला आहे. आता तो कुठेही सापडत नसल्याने कंपनीने कायदेशीर कारवाई केली आहे. कर्मचारी बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने आपले पैसे परत मिळवण्यासाठी आधीच सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Money, Money fraud, Salary

    पुढील बातम्या