'ना उमर की सीमा हो..'! आजोबांच्या वयाच्या व्यक्तीवर जडलं 28 वर्षीय तरुणीचं प्रेम, लिव्ह इनमध्ये राहातंय कपल

'ना उमर की सीमा हो..'! आजोबांच्या वयाच्या व्यक्तीवर जडलं 28 वर्षीय तरुणीचं प्रेम, लिव्ह इनमध्ये राहातंय कपल

कॅल्सीची भेट एका योगा क्लासवेळी आपल्यापेक्षा 48 वर्षानी मोठ्या असलेल्या गाय बोंगिओवन्नी (Guy BonGiovanni)यांच्यासोबत झाली. इथेच दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली आणि आज दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-In Realtionship) राहातात.

  • Share this:

नवी दिल्ली 01 मे : प्रेमाला वयाची किंवा कोणत्याच गोष्टीची सीमा नसते, असं आपण अनेकदा ऐकतो. याचं उत्तम उदाहरण आता समोर आलं आहे. ही अनोखी प्रेम कहाणी (Love Story) आहे सॅन डिएगोमध्ये राहाणाऱ्या कॅल्सीची. कॅल्सीची भेट एका योगा क्लासवेळी आपल्यापेक्षा 48 वर्षानी मोठ्या असलेल्या गाय बोंगिओवन्नी (Guy BonGiovanni) यांच्यासोबत झाली. इथेच दोघं खास मित्र झाले. पुढे हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली आणि आज दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-In Relationship) राहातात. मात्र, वयातील अंतर कॅल्सीला चिंता करण्यास भाग पाडतं आणि अनेकदा तिला रडू कोसळतं. कारण, वयातील या अंतराचा अर्थ पुढील काही वर्षातच तिला गायला गमवावं लागेल, याचं कल्पना तिला आहे.

अलास्कामध्ये एका योगा क्लासदरम्यान या दोघांची भेट झाली. यावेळी गाय यांनी आपली पत्नी गमावली होती, त्यामुळे मन रमवण्यासाठी ते त्यांनी हे क्लास जॉईन केले होते. तिथेच दोघांची पहिल्यांदा भेट झाली. सुरुवातील दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे ती प्रेमात बदलली. दोन वर्ष खास मित्र म्हणून राहिल्यानंतर त्यांना एकमेंकांवर प्रेम जडलं.

2020 लॉकडाऊनच्या काही काळ आधी दोघांनीही आपल्या नात्याबाबतची अधिकृत घोषणा केली. कॅल्सीनं सोशल मीडियावर दोघांचे फोटो अपलोड केले. मात्र, यानंतर अनेकांनी तिला ट्रोलही केलं. मात्र, लोक काय बोलतात याचा मला काहीच फरक पडत नसल्याचं कॅल्सीनं सांगितलं. सुरुवातीला या दोघांच्या कुटुंबीयांनीदेखील त्यांच्या नात्याला विरोध केला, मात्र त्यांच्यातील बॉन्डिंग पाहून नंतर ते तयार झाले.

कॅल्सी आणि गायला एकत्र पाहून अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. अनेक लोक त्यांना आजोबा आणि नात समजतात. तर, काही कॅल्सी त्यांची केअरटेकर असल्याचा समज करुन घेतात. वयात 48 वर्षाचं अंतर असल्यानं अनेकदा त्यांची मस्करी केली जाते. मात्र, आता दोघांनाही याची सवय झाली आहे. आपल्या प्रेमापुढे त्यांना लोकांचे टोमणेही काहीच वाटत नाहीत. मात्र, या वयामुळे कॅल्सीला एकच दुःख आहे, की ती गाय यांच्यासोबत जास्त काळ राहू शकणार नाही.

Published by: Kiran Pharate
First published: May 1, 2021, 12:47 PM IST

ताज्या बातम्या