VIDEO : जिद्दीला सलाम! जन्मत:च हात नसल्याने पायांनी चालवते गाडी, आनंद महिंद्रांकडून तरूणीचं कौतुक

VIDEO : जिद्दीला सलाम! जन्मत:च हात नसल्याने पायांनी चालवते गाडी, आनंद महिंद्रांकडून तरूणीचं कौतुक

28 वर्षीय जिलोमुल मॅरिअट थॉमस हिला थॅलिडोमाइड सिंड्रोम हा दुर्लभ आजार आहे. तिला जन्मापासूनच दोन्ही हात नाही आहेत. तरी सुद्धाती तिच्या पायांनी कार चालवते आणि याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

केरळ, 02 जून : काही लोकांच्या धैर्याला सलाम करताना शब्द अपूरे पडतात. त्यांच्यासमोर आलेल्या संकटांचा ते अगदी सहजगत्या सामना करतात आणि जिंकून दाखवतात. अशीच कहाणी आहे 28 वर्षीय जिलुमोल मॅरिअट हिची. जिलोमुलला थॅलिडोमाइड सिंड्रोम हा दुर्लभ आजार आहे. त्यामुळे तिला जन्मापासूनच दोन्ही हात नाही आहेत. तरी सुद्धा जिलोमुल हिच्या धैर्याचं कौतुक सर्व ठिकाणी होतंय, कारण ती तिच्या पायांनी कार चालवते आणि याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, जिलुमोल पायांच्या मदतीनेच गाडीचे दार उघडते. त्यानंतर पायाचा अंगठा आणि बोटांच्या मदतीने गाडीला चावी देऊन ती सुरू करते. त्यानंतर गुडघे आणि पायांच्या मदतीने ती लीलया गाडी देखील चालवते.

(हे वाचा-OMG! ...आणि पाहता पाहता 20 फूट अजगरानं गिळला मोर, VIDEO VIRAL)

अशाप्रकारच्या परिस्थितीत गाडी चालवण्याचा परवान असणारी जिलुमोल पहिली महिला आहे, अशी माहिती देखील काही मीडिया अहवालांनी दिली आहे.

आनंद महिंद्रांनी जिलोमुलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले की, 'मला वाटतं की हा व्हिडीओ पाहून मला साहस या शब्दाचा अर्थ अधिक उत्तम पद्धतीने समजला. या व्हिडीओचा कोव्हिडशी काही संबंध नाही आहे पण हा व्हिडीओ असा विश्वास देतो की, या संकटाच्या काळात आपण कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतो'. 3 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

अहवालानुसार जिलुमोल मॅरिअट थॉमस केरळची रहिवासी आहे. थोडूपूजा जवळील करिमानूर गावात ती राहते. ती ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते तर गाडी चालवण्याची आवड असल्याने तिने 2014मध्ये पहिल्यांदा याकरता अर्ज केला होता. 2018 मध्ये तिने उच्च न्यायालयाचे दरवाजे देखील खटखटवले होते. त्यानंतर तिला केंद्र सरकार द्वारे लर्निंग लायसन्स देण्यात आले.

First published: June 3, 2020, 10:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या